manmad.
manmad. 
उत्तर महाराष्ट्र

कोंबडीने दिला चार मोराच्या पिलांना जन्म

अमोल खरे

मनमाड - 'आई मरो आणि मावशी जगो' अशी आईपणाची महती सांगणारी म्हण माणसांसह पशुपक्षांनाही लागू पडते याचा प्रत्यय आला तो अनकवाडे येथील विष्णू जाधव यांच्या शेतात. सापडलेल्या मोराचे अंडे कोंबडी खाली उबवून त्यातून चार पिल्ले निघाली आणि कोंबडीने अगदी सख्ख्या आई प्रमाणे पिल्लांना यांभाळल्याची घटना मनमाडमध्ये घडली.  

अनकवाडे शिवारात विष्णू जाधव यांचा मळा आहे. गायी म्हशी, शेळ्या, कोंबड्या अशा पशुपक्षांनी त्यांचा गोठा खुराडे भरलेले आहे. नित्यनेमाने जाधव हे आपल्या शेताच्या बांधाने जात असतांना बांधाच्या खाली गवतामध्ये पांढरे शुभ्र सहा अंडे दिसले. अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा आकाराने काहीसे मोठे होते. त्यांनी जागीच थांबून आसपास पाहिले कोणीच दिसले नाही. अंडे कोणत्या पक्षाचे असेल याचा विचार करत सभोवताली पाहत असतांना त्यांना इतस्थ लांडोरीचे पंख पडलेले दिसले. अंड्यावरील लांडोर मादी कोल्ह्या कुत्र्यांनी मारली असल्याचे लक्षात येताच जाधव यांनी हातात अंडी उचलून घरची वाट धरली. अंडी घरी आल्यावर पत्नी किशोरी जाधव यांच्याकडे दिले त्याचवेळी जाधव यांच्या कोंबड्यातील एक कोंबडी खुड झाली होती. किशोरीबाईंनी सहा अंडी आणि कोंबडीची सहा आशा बारा अंड्यावर खुड झालेली कोंबडी एका टोपल्याखाली बसवली. अंडे घोळणे, उबवणे सुरू असतांनाच काही दिवसांनी यातील नेमकी मोराच्या सहा अंड्यापैकी चार अंड्यातून पिल्ले निघाली आणि दोन अंडे गंदे निघाले. मात्र कोंबडीने इतर सहा कोंबडीचे अंडे घोळणे सोडून दिले. या चार मोराच्या पिल्लांचा ती आपले पिल्लू समजून आईची माया देऊन त्यांना जीव लावू लागली. आज तीन दिवस झाले पिल्ले कोंबडीच्या पिल्लांच्या आकारापेक्षा मोठे आहे. आपलीच पिल्लं समजून त्यांना आपल्या पंखात घेऊन बसते. पिल्लांना कोणी हात लावला तर चोचीने टोचा मारते. ते लांडोरीचे-मोराचे पिल्ल कोंबडीने आपलेच समजुन आईची माया दिली आहे जणु ते सुद्धा त्यातलेच वाटते कोंबडीच्या पिल्ला पेक्षा त्याची वाढ जास्त वाटत आहे. इतर पिलांच्या तुलनेत आकारानं मोठी असलेली, आणि झपाट्यानं आकार बदलणारी चार मोराची पिलं कोंबडीच्या इतर पिलांसोबत चरतांना दिसतात. तशी ती पिल्लं कोंबडीच्या पिलांसोबतच वाढत आहे कोंबडीच्या पिलांसोबतच खातपित आहे कोंबडीने आवाज दिल्याबरोबर मोराची पिल्ले कोंबडीकडे धावून येतात. मात्र ही पिल्ले लहान असल्याने मादी आहे की नर हे कळू शकत नाही. 

आमच्या भागात अनेक मोर आहे शेतात चक्कर मारत असतांना बांधावर सहा अंडी मिळाली आसपास पीसं पडले असल्याने ती मोराची असल्याची लक्षात आल्यावर घरी आणून कोंबडी खाली उबवली चार पिल्लं निघाली आहे पिल्लं मोठी झाली की जातील इतर मोरांबरोबर नाही तर वन विभागाकडे सुपूर्द करू. 
- विष्णू जाधव, शेतकरी, अनकवाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT