Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
उत्तर महाराष्ट्र

मुख्यमंत्री घेणार उद्या दत्तक नाशिकचा आढावा

सकाळवृत्तसेवा

नाशिक - येत्या शुक्रवारी (ता. 5) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, शुक्रवारी ते नाशिक जिल्ह्यातील कामाचा आढावा घेणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्याच्या कामाचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री आढावा घेणार म्हणून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत येत्या शुक्रवारी पोलिस उपनिरीक्षक 115 व्या तुकडीचा दिक्षान्त समारंभ आहे, त्यासाठी मुख्यमंत्री नाशिकला येणार आहेत. दिक्षान्त समारंभानंतर तेथील सुमारे 168 खोल्यांची सोय असलेल्या सप्तशृंगी निवास संकुलाचे उद्‌घाटन आणि इतर कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत. त्यानंतर तेथून नाशिक रोडला विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

यंत्रणेची धावाधाव
मुख्यमंत्री येणार म्हणून जिल्ह्यातील सगळ्याच प्रमुख शासकीय विभागांतील फायलींच्या प्रवासाला गती आली आहे. विविध विभागांचे अधिकारी पूर्णवेळ कार्यालयात थांबून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा सुरू आहे. रस्तेविकास, जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, कायदा सुव्यवस्था यासह मुख्यमंत्र्यांच्या व राज्यातील भाजप सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांचा निपटारा सुरू झाला आहे. नाशिक दत्तक घेतल्याच्या घोषणेनंतर केवळ नाशिकच्या प्रश्‍नांसाठी म्हणून पहिलीच महत्त्वाची बैठक असणार आहे.

वसतिगृहाचे उद्‌घाटन
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे शुक्रवारी (ता. 5) महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वसतिगृहाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी लावणार का, की उद्‌घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार, हे मात्र सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT