yevla.jpg
yevla.jpg 
उत्तर महाराष्ट्र

दरसवाडी ते डोंगरगाव पोहोच कालव्याचे अस्तरीकरण करा : आमदार नरेंद्र दराडे

संतोष विंचू

येवला : वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या भागाला मांजरपाडा प्रकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. लोक काम पूर्ण होण्याची आतुरतने वाट पाहता आहेत. मांजरपाडासह इतर कामांना शासनाने निधीची तरतूद केली असल्याने ही कामे तत्काळ सुरू करावीत तसेच येवला व चांदवड मधील दुष्काळी गावांना जलसंजीवनी देण्यासाठी दरसवाडी ते डोंगरगाव या पोहोच कालव्याचे अस्तरीकरण करावे अशी मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

आमदार दराडे यांच्या पुढाकारातून आज नाशिक येथील सिंचन भवनात मांजरपाडा प्रकल्प व पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्याच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्याकडे दराडे यांनी ही आग्रही मागणी केली.यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश संघानी, नांदूरमधमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव, सहाय्यक अभियंता विश्वास दराडे, चेतन पवार तसेच दराडे यांच्यासह शिवसेनेचे सर्जेराव सावंत,काँग्रेसचे नेते अरुण आहेर, पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यावेळी उपस्थित होते.

मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्यासाठी शासनाने सुप्रमा मंजूर करून निधी धरला आहे. त्या कामाला तातडीने सुरुवात करावी अशी मागणी करत दुष्काळी भागाला पाण्याचा पुरेपूर लाभ द्यायचा असेल तर पूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करा.यासाठी सुमारे १७० कोटींचा खर्च येणार आहे. पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी अस्तरीकरनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी सूचना दराडे यांनी केली. याकामाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठकीचा आग्रह धरू असे दराडे यांनी यावेळी सांगितले. मांजरपाड्याच्या प्रलंबित कामांनाही चालना देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

दरसवाडी डोंगरगाव दरम्यान ठेकेदारांनी ठिकठिकाणी अर्धवट काम ठेवल्याने चाचणीदरम्यान पाणी अडले होते. हे दराडे यांनी निदर्शनास आणून दिल्यावर मधल्या भागातील सोडलेले काम पंधरा दिवसांत पूर्ण करू तसेच पावसाने धरण भरल्यास चाचणीसाठी पाणी सोडण्याचे आश्वासनही अहिरराव यांनी यावेळी दिले. नगरसूल जवळ कालव्याच्या रेल्वे क्रॉसिंगचे काम एका महिन्यात पूर्णत्वास जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी दराडे यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांचीही माहिती घेत मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

पाहणी करत बैठकीला...
दरम्यान या बैठकीला जाण्यापूर्वी दराडेंसह सहकाऱ्यांनी तळवाडे येथे लाभक्षेत्रातील शेतकऱयांची बैठक घेऊन चर्चा केली.राहिलेल्या कामाचा पाठपुरावा करून डोंगरगाव पर्यंत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शेतकऱ्.यांनी यावेळी केले. या कामांना चालना मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दराडे यांनी दिले. यानंतर दरसवाडी पर्यंत कालव्याची पाहणी करून सर्व पदाधिकारी बैठकीसाठी नाशिककडे रवाना झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT