उत्तर महाराष्ट्र

‘बऱ्हाणपुरी मुजऱ्या’त धडक कारवाईनंतरही नाचक्की!

सकाळवृत्तसेवा

जळगाव - पोलिसांनी ‘बऱ्हाणपुरी मुजरा’ करणाऱ्या ६ नर्तक्‍या तरुणींसह १८ आंबटशौकिनांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध अगोदर राज्य शासनाने मुंबईतील डान्सबार बंदीसाठी केलेल्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. नंतर पोलिस दलास साक्षात्कार होऊन प्रथमदर्शनी किमान २५ लाखांच्या दंडाचा गंभीर गुन्हा कलमांच्या हेराफेरीतून प्रतिबंधात्मक कारवाईपर्यंत सीमित करण्यात आला आणि इथेच या धडक कारवाईवर ‘पाणी’ फिरले. कौतुकाऐवजी आता ही कारवाई पोलिसांच्या नाचक्कीचा विषय ठरत आहे.

कोल्हे फार्म हाउसवर सुरू असलेल्या ‘बऱ्हाणपुरी मुजऱ्या’वर छापा टाकत मध्यरात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतलेल्या सहा तरुणींसह २४ संशयितांना सकाळी सहाला तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

साडेदहाला त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले.. तेथून परत माघारी बोलवत दुपारी डान्सबार अधिनियमांतर्गत (the maharashtra prohibition of obscene dance in hotel, restaurant and bar rooms and protection of dignity of women act -२०१६) गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यानुसार आयोजक संशयितांना तब्बल २५ लाखांचा दंड आणि १० वर्षांची शिक्षेची तरतूद कायद्यात नमूद आहे. 

कलमांची फेरफार
संशयितांना न्यायालयात आणताना रस्त्यातच पोलिसांना ‘आज्ञा’ होऊन साक्षात्कार घडला. संबंधित कलमाने न्यायालयात हजर करण्यापूर्वीच रिमांड रिपोर्ट आणि कागदपत्रे बदलून नंतर सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड, असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कारवाईसाठी वापरला जाणारा बॉम्बे पोलिस ॲक्‍ट (बीपी ॲक्‍ट) कलम-११० आणि कलम-११७ अंतर्गत हा नाच बसवण्यात आला. परिणामी, आज न्यायालयाने सर्व संशयितांनी गुन्हा कबूल असल्याचे सांगितल्यावर प्रत्येकी १ हजार दंडावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. 

वकिलांच्या अभ्यासावर पाणी
महाराष्ट्र शासनाच्या डान्सबार बंदीविरोधात केलेल्या अधिनियमातील कलमान्वये कारवाई होऊन तशी कागदपत्रे सरकारी वकिलांच्या हातात पडली. त्यानुसार युक्तिवाद आणि कायद्याचा तासन्‌तास अभ्यास केल्यावर पोलिसांचा रिमांड रिपोर्ट माघारी होऊन नंतर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत संशयितांना हजर करत असल्याचे समोर आल्याने सरकारी वकिलांच्या मेहनतीवर पाणी फिरले. गरजच नसल्याने आदल्या दिवशी सायंकाळी सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांनी घरचा रस्ता धरला होता.

प्रश्‍नांना उत्तरेच नाहीत!
पोलिसांच्या कारवाईनंतर माहिती घेतल्यावर ममुराबाद रस्त्यावरील कोल्हेंचे फार्म हाउस सांगितले जात होते. नंतर दुसऱ्या दिवशी हे फार्म हाउस कोणाचे आहे, याचा शोध घेतला जात असून, त्या मालकावर कारवाईच्या आम्ही तयारीत असल्याचे सांगितले गेले. थोड्या वेळाने हा फार्म हाउस कोणाचा आहे, हेच माहिती नसल्याचे पोलिस म्हणाले आणि घटनास्थळ खासगी मिळकत आणि मालकीचे असताना पोलिसांनी लावलेल्या कलमांत ते, सार्वजनिक ठिकाण म्हणून दर्शविण्यात आल्याची जादुगरी पोलिसांनी घडवून आणली आहे. रस्त्यावरील भुरट्यांवर दंडुका उगारणाऱ्या पोलिस दलाची या गुन्ह्यामुळे पुरती नाचक्की झाल्याची चर्चा सुरू आहे. पण, त्यावर पोलिस अधिकारी बोलायला तयार नाहीत. 

गुन्ह्यात ‘या’ कलमांचा समावेश नाही
मुजरा पार्टीत दारुच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. त्यासोबत या अतिरिक्त कलमान्वये (कोपटा), विनापरवाना दारू पिणे या कलमांतर्गतही कारवाई होऊ शकत होती. मात्र, पोलिसांनी ती केली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT