उत्तर महाराष्ट्र

तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर फटाके फोडल्याने गुन्हा

सकाळवृत्तसेवा

नाशिक - महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर महापौरांच्या टिळकवाडीतील ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडण्यात आल्याप्रकरणी २४ तासांनी सरकारवाडा पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पोलिसांकडे मुंढेसमर्थक ‘आम्ही नाशिककर’च्या सदस्यांनी मागणी केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांना उपरती झाली आणि पोलिसांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. 

मुंढे यांची गुरुवारी (ता. २२) बदली झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत, महापौर रंजना भानसी यांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके फोडले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके वाजविण्यास परवानगी आहे. देवदिवाळीनिमित्ताने काही भाविकांनी मध्यरात्री फटाके फोडले असता कर्तव्यदक्ष पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत गुन्हे दाखल केले. मात्र, महापौरांच्या बंगल्यासमोर पोलिसांसमक्ष फटाके फोडल्यानंतरही त्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. याप्रकरणी ‘आम्ही नाशिककर’चे सदस्य जितेंद्र भावे, समाधान भारतीय यांच्यासह सदस्यांनी आज सकाळी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले आणि महापौरांसह त्यांच्या समर्थकांवर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची  मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT