Demand for reelection of Devendra Patil as President of Samata Parishad Dhule 
उत्तर महाराष्ट्र

समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करण्याची मागणी!

प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी मागणी ज्येष्ठ समता समता सैनिक, जैताणेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी केली आहे. बुधवारी (ता. 10) जिल्हाध्यक्ष पदासाठी झालेल्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातून चार ते पाच जणांनी मुलाखती दिल्याचे समजते.

विद्यमान जिल्हाध्यक्ष पाटील हे माजी मंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ अटकेत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. अटकेच्या काळात समता सैनिकांना संघटित करून केलेल्या विविध आंदोलनांत ते सातत्याने आघाडीवर होते. समता परिषदेशी गद्दारी करणाऱ्यांना व भुजबळांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनाही चांगलाच धडा शिकवावा, अशी मागणीही संजय खैरनार यांनी केली आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांसह समता सैनिकांसमवेत पाठिंब्याचे पत्र समता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीला देणार असल्याचे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे साक्री तालुकाध्यक्ष तथा जैताणेचे उपसरपंच नवल खैरनार, माळी महासंघाचे साक्री तालुकाध्यक्ष पंकज सोनवणे, म्हसाळेचे मा. सरपंच गुलाब माळी आदींसह माळमाथा परिसर व साक्री तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते, समतासैनिकांनी देवेंद्र पाटील यांची पाठराखण केली आहे. भुजबळांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.नरेंद्र तोरवणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने देखील रस्ता रोको आंदोलन करून संबंधित शासकीय यंत्रणेला निवेदनही दिले होते, असेही संजय खैरनार म्हणाले.

"माजी मंत्री छगन भुजबळ अटकेत असताना आपण धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील समता सैनिकांचे मनोबल वाढवून त्यांना विविध आंदोलनात सहभागी करून घेत शासनावर दबाव निर्माण केला. काही पदाधिकारी मात्र कोपऱ्यात लपून बसले होते. अशा विश्वासघातकी लोकांकडे वरिष्ठांनी जिल्ह्याचे नेतृत्व देऊ नये, हीच प्रामाणिक अपेक्षा आहे." - देवेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, समता परिषद, धुळे जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” बाबर आजमची विकेट चर्चेत; पाकिस्तानचा पायावर कुऱ्हाड मारणारा निर्णय अन् इंग्लंडची सरशी

Latest Marathi News Live Update : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी समिती स्थापन

GeoSpy AI: नवीन एआय! फोटो कुठे काढला, त्याची माहिती देणार! गोपनियतेबद्दल जगभरातून शंका

चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

SCROLL FOR NEXT