Moments of Bharatnatyam, Khandesi dance performance on the second day of Mahasanskrit Mahotsav. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महासंस्कृती महोत्सवाची रंगत उत्तरोत्तर वाढे!

Dhule : पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरतनाट्यम, खानदेशी नृत्य, आपली मायबोली अहिराणी गीत, आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांनी रंग चढविला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई जिल्हा प्रशासन, धुळे यांच्यातर्फे आयोजित पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरतनाट्यम, खानदेशी नृत्य, आपली मायबोली अहिराणी गीत, आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांनी रंग चढविला. या कार्यक्रमांना धुळेकर रसिक प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता. (Dhule audience responded cultural program on second day of Mahasanskruti Mahotsav)

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे.

जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर, तहसीलदार पंकज पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर नागरिक उपस्थित होते. (latest marathi news)

श्री. बालन व सहकारी यांनी भरतांजली भरतनाट्यम नृत्य, जितू नगराळे, मुकेश तायडे, राहुल मंगळे, विकी माळीच, दीपक साळुंखे, आकाश वाघ, मयूर गुळवे, राज वाघ यांचा खानदेशी नृत्याविष्कार, एसव्हीकेएम स्कूल, धुळेच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राची संस्कृती नृत्य, महादेव बम बम भोले.., आदिवासी ठक्कर नृत्य.

वासुदेव नृत्य, खानदेश किंग ग्रुप बजरंग बॅण्ड, शिरपूरचे आबा चौधरी, धीरज चौधरी यांची आपली मायबोली खानदेशी अहिराणी गीते, तसेच युवा मनाचे स्पंदन टिपणारा, कविता व गीतांनी मनामनांत संवाद साधणारा डॉ. सलील कुलकणी, संदीप खरे व सहकाऱ्यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातील जरा चुकीचे, जरा बरोबर.

आयुष्यावर बोलू काही? अग्गोबाई, ढग्गोबाई लागली कळ..., मी हजार स्वप्नांचे..., नसतेस घरी तू जेव्हा.., दमलेल्या बाबांची कहाणी... आदी गीतांनी मैफलीत चांगलाच रंग भरला. उपस्थित रसिक प्रेक्षकांची या कार्यक्रमांना दिलखुलास दाद लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT