MLA Jaykumar Rawal performing Bhoomi Puja for various development works at raul Nagar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : राऊळनगरचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रावल

Dhule : दोंडाईचा (ता.शिंदखेडा) शहरातील राऊळ नगर परिसरात विविध कामाची कामे झाली असून सध्या जलकुंभ, रस्त्यांची कामे, आदी सहा कोटींची विकासकामे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दोंडाईचा (ता.शिंदखेडा) शहरातील राऊळ नगर परिसरात विविध कामाची कामे झाली असून सध्या जलकुंभ, रस्त्यांची कामे, आदी सहा कोटींची विकासकामे आहेत. त्यामुळे राऊळ नगराचा चेहरामोहरा बदलणार आहे असे प्रतिपादन आमदार जयकुमार रावल यांनी केले.

दोंडाईचा शहरातील राऊळ नगर परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार श्री. रावल यांच्याहस्ते झाले. (Dhule Bhoomi Pujan of various development works in Dondaicha by mla Rawal)

यात विविध भागातील रस्ते, राऊळ नगर येथे जलकुंभ, सालदार वाडी येथे सार्वजनिक शौचालय, निरंकारी भवन येथे पेव्हर ब्लॉक, कबीरवाडी परिसरात शिवमंदिर, जुने गॅस गोडावून येथे शिवमंदिर सभागृह आदी कामांचे भूमिपूजन तर इतर भागातील काही रस्ते कामांचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी आमदार श्री. रावल म्हणाले, की दोंडाईचा शहरातील राऊळ नगर या भागत मागील सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या बाबतीत मोठा दुजाभाव केला. (latest marathi news)

त्यामुळे या भागाचा अनुशेष भरण्याचे काम करण्यात आले. मागील काळात या भागातील ओपन स्पेस सुशोभित करण्यात आल्या. तसेच अनेक रस्त्यांची कामे झाली. आता सद्यःस्थितीत सहा कोटींची विकासकामे मंजूर असून यातून या भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे.

याप्रसंगी माजी बांधकाम सभापती जितेंद्र गिरासे, माजी नगरसेवक भरतरी ठाकूर, चंद्रकला सिसोदिया, आकाश कोळी, रामकृष्ण बडगुजर, पंकज बोरसे, नरेंद्र ठाकूर, सागर गिरासे, देवा पाटील, सागर ठाकूर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT