Vishal Narwade esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सीईओ नरवाडे यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार!

Dhule News : जिल्हाधिकारी अभिनव गोयल रजेवर असल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील जिल्हाधिकारी अभिनव गोयल रजेवर असल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. विशाल सविता तेजराव नरवाडे २०२० च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील राजपत्रित सनदी अधिकारी आहेत. (Dhule CEO Narwade has charge of Collectorate)

नियमित जिल्हाधिकारी गोयल एक आठवडा रजेवर असल्याने जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार जिल्ह्यातील दुसऱ्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याकडे दिला जातो आणि त्यानुसार हा कार्यभार श्री. नरवाडे यांच्याकडे देण्यात आला.

यापूर्वी श्री. नरवाडे यांची बुलडाणा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली होती. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात काम केले. (latest marathi news)

त्यांनी २०२२ मध्ये केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून पद भूषविले असून, त्यांनी एक वर्षाचे त्यांचे जिल्हा प्रशिक्षण सांगली येथे केले आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी श्री. नरवाडे २०१६ ते २०२० अशी चार वर्षे भारतीय पोलिस सेवेत होते. श्री नरवाडे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT