Anup Agarwal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळेकरांवर `डिस्काउंट`चा वर्षाव अग्रवाल यांच्याकडून विशेष ‘ॲप’

Dhule : शहर विधानसभा मतदारसंघप्रमुख अनुप अग्रवाल यांनी विशेष `ॲप`व्दारे धुळेकरांवर `डिस्काउंट`चा वर्षाव केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : माझे शहर, माझी जबाबदारी या संकल्पनेअंतर्गत भाजपचे शहर विधानसभा मतदारसंघप्रमुख अनुप अग्रवाल यांनी विशेष `ॲप`व्दारे धुळेकरांवर `डिस्काउंट`चा वर्षाव केला आहे. यात एकीकडे नागरिकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढत असताना स्थानिक स्तरावरील व्यावसायिकांना बळ मिळावे, यासाठी ‘डिस्काउंट ॲप’ प्रभावी ठरू शकेल, असाही प्रयत्न अग्रवाल यांनी केला आहे. (citizen happy due to discount by Agarwal special app )

यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत माहिती दिली. अग्रवाल म्हणाले, की धुळेकरांना मोफतपणे ॲप डाऊनलोड करता येईल. शहर व जिल्ह्यातील नागरिक ते डाऊनलोड करू शकतील. प्रत्येक जण रोज एखादी वस्तू खरेदी करत असतो. त्यासह शिक्षण, आरोग्यासाठी पैसा खर्च होत असतो. या प्रक्रियेत मोबाईल हाताळणी करणारा गरीब, सर्वसामान्य व्यक्ती ते उच्चभ्रूंपर्यंत कुणालाही खर्च टळत नाही. ते लक्षात घेता धुळेकरांची चिंता कमी करावी आणि त्यांना सवलतीत खरेदी यावी यासाठी स्वतंत्र ॲप विकसित केले आहे.

व्यावसायिक तयार

ॲपच्या माध्यमातून सेवा व खरेदीवर चांगले डिस्काउंट मिळणार आहे. ते शुक्रवारपासून मोफत सेवेत दाखल झाले आहे. यात शहरातील निरनिराळे व्यापारी, व्यावसायिक आणि सेवा देणाऱ्यांनी धुळेकरांसाठी ‘डिस्काउंट’ देणे मान्य केले. त्यामुळे ही सेवा देणे शक्य होत आहे. ‘डिस्काउंट’ च्या यादीत असंख्य व्यावसायिक, व्यापारी, सेवारत संस्था समाविष्ट होण्यास तयार आहेत.

मोबाईलमध्ये लिंक आल्यावर ती ओपन करावी. ग्राहक म्हणून स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक, वय, पत्ता, अशी माहिती भरल्यावर संबंधितांचा संपर्क थेट अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयाशी होईल. तेथे नोंद झाल्यावर ग्राहकाच्या मोबाईलवर पुन्हा या संदर्भात युजरनेम, पासवर्डचा मेसेज येईल. तो पासवर्ड टाकताच ॲप कार्यान्वित होईल. (latest marathi news)

अग्रवाल यांचे आवाहन

ॲपमध्ये निरनिराळे व्यावसायिक, हॉस्पिटलची यादी दिसेल. कुणाकडे किती ‘डिस्काउंट’ मिळेल हेही दिसेल. हॉस्पिटल किंवा दुकानात ॲप ओपन केल्यावर त्यात अनुप अग्रवाल यांच्या नावाचे स्कॅन-कोड स्टिकर लावलेले असेल, त्यावरचा बारकोड ॲपमध्ये स्कॅन केल्यास ग्राहकाला डिस्काउंटची सुविधा मिळेल. यात सध्या शहरातील शंभराहून अधिक व्यावसायिक, काही हॉस्पिटल्स समाविष्ट आहेत.

पॅथॉलॉजी लॅब, दवाखाने- रुग्णालय, किराणा दुकान, हार्डवेअर, फुटवेअर, कॉस्मेटिक, डेअरी प्रॉडक्ट, बेकरी, शैक्षणिक खासगी क्लासेस, लॉन्ड्री, रेस्टॉरंट, टाइल्स, कृषी, सोने- चांदी, स्टँप वेंडर, आर्टिफीशयल ज्वेलरी, वह्या- पुस्तके, स्पेअरपार्ट आदींवर सरासरी दहा ते तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तसेच काही हॉस्पिटलमध्ये ओपीडीवर २५ टक्के, तर ॲडमिट केल्यावर बिलात सरासरी २० ते ३० टक्के पर्यंतचे डिस्काउंट मिळेल, असे अग्रवाल यांनी सांगितले.

धुळेकरांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, हिरामण गवळी, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, भारती माळी, किरण कुलेवार, नागसेन बोरसे, ॲड. रोहित चांदोडे, भगवान गवळी, राजेश पवार, यशवंत येवलेकर, भिकन वराडे, शशी मोगलाईकर, अजय अग्रवाल, संदीप बैसाणे, दिनेश बागूल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात, दोन ट्रकसह सात दुचाकी खाक

Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

महाराष्ट्र सरकारचा खर्चकपात फॉर्म्युला! मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध; नवे नियम लागू

SCROLL FOR NEXT