Police team talking to the rickshaw pullers about the action. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 9 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई

Dhule : शहरातील वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वर्तन करणाऱ्या नऊ रिक्षाचालकांवर शहर वाहतूक शाखेने शुक्रवारी (ता. २२) कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वर्तन करणाऱ्या नऊ रिक्षाचालकांवर शहर वाहतूक शाखेने शुक्रवारी (ता. २२) कारवाई केली. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते व पथकाने ही कारवाई केली. शहरात अलीकडेच स्कॅपमध्ये गेलेल्या रिक्षांविरुद्ध मोहीम उघडली गेली होती. त्यानंतर वाहतुकीची समस्या लक्षात घेता रिक्षाचालकांनी त्यांना नेमून दिलेल्या थांब्यावर आपल्या रिक्षा लावाव्यात, अशी सूचनाही वाहतूक शाखेने दिली होती. (Dhule city traffic department)

नेमून दिलेल्या रिक्षा थांब्यावर रिक्षा थांबल्यास वाहतुकीचे नियमन सुरळीतपणे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करत बेशिस्त पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या नऊ रिक्षाचालकांवर शुक्रवारी दंडात्मक कारवाई केली. कराचीवाला खुंट.

बसस्थानक आणि संतोषीमाता चौकात ही कारवाई झाली. रिक्षाचालकांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारला. (latest marathi news)

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कोते.

सुनील इनमुलवार, जितेंद्र आखाडे, भागवत पाटील, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर देसले, विवेक वाघमोडे, दीपिका वाघमोडे आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

Raigad Shivrajyabhishek celebration: रायगडावर तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गडावर शिवमय वातावरण

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

SCROLL FOR NEXT