Polio Vaccination esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Polio Vaccination : पोलिओ डोसपासून एकही बालक वंचित नको : जिल्हाधिकारी गोयल

Dhule Polio Vaccination : जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकूण एक लाख ८८ हजार ४७० बालकांना ३ मार्चला (रविवारी) पोलिओ लस देण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Polio Vaccination : जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकूण एक लाख ८८ हजार ४७० बालकांना ३ मार्चला (रविवारी) पोलिओ लस देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत एकही बालक वंचित राहू नये यासाठी पोलिओ लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा कार्यबल समितीची बैठक झाली.

जिल्हाधिकारी गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल.

साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी अ. रा. पाटील, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की केंद्र सरकारने पोलिओ निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एक लाख ८८ हजार ४७० बालकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात एकूण एक हजार ६३७ पोलिओ बूथ असणार आहेत. (Latest Marathi News)

यासाठी ९५ मोबाईल टीम शहरी व ग्रामीण भागात काम करणार आहेत. तसेच बसस्थानके, रेल्वेस्थानक, टोलनाके, जेथे प्रवासाच्या दरम्यान ये-जा असते अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार ट्रांजिट टीम कार्यरत असतील. एकूण ७२ ट्रांजिट टीम काम करणार आहे़.

पालकांना आवाहन

या मोहिमेमध्ये पालकांनी आपल्या घरातील व आपल्या परिसरातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांना जवळच्या लसीकरण बूथवर नेऊन पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा.

सर्व पालकांनी आठवणीने बालकाला पोलिओची लस देऊन आपल्या जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देगावकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT