Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : धुळ्यातील धोकादायक इमारती रिकाम्या करा : आयुक्त दगडे- पाटील

Dhule News : महापालिकेने शहरातील धोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्यासंबंधी नोटिस बजावल्या आहेत. यापूर्वीही प्रशासनाने महापालिका हद्दीतील धोकादायक इमारती पाडण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेने शहरातील धोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्यासंबंधी नोटिस बजावल्या आहेत. यापूर्वीही प्रशासनाने महापालिका हद्दीतील धोकादायक इमारती पाडण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली आहे. ज्या इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक आहेत, त्या मुसळधार पावसामुळे कोसळून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असते.

असे इमारतधारक, भाडेकरू, भोगवटादारांनी तत्काळ धोकादायक इमारती रिकाम्या कराव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे- पाटील यांनी दिले आहेत. प्रसंगी धोकादायक इमारत कोसळून काही अप्रिय, अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही इमारतधारक, भाडेकरू वा भोगवटादाराची असेल, असे प्रशासक दगडे-पाटील यांनी कळविले आहे.

स्वतः निष्कासित करा

महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींबाबत सर्वेक्षण केले. यात प्रथमदर्शनी १५३ धोकादायक इमारती आढळल्या. जुने धुळे, गल्ली क्रमांक एक ते सहा या गावठाण क्षेत्रासह इतर काही ठिकाणी शहरात धोकादायक, जुन्या, जीर्ण इमारती आहेत. यातील अनेक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. (latest marathi news)

पावसाळ्यात अशा धोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये, वित्त व जीवितहानी होऊ नये यासाठी महापालिकेने तरतुदीनुसार संबंधितांना नोटिसा बजावली आहे. आपापल्या अशा इमारती स्वतःहून निष्कासित कराव्यात, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, अशा प्रकारची नोटिसा १५३ इमारतधारकांना यापूर्वीच बजावण्यात आली आहे, असे प्रशासक दगडे- पाटील यांनी सांगितले.

६२ इमारतींची दुरुस्ती आवश्‍यक

शहरात १५३ पैकी सरासरी १८ इमारती रिकाम्या करून त्यांची संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच ६७ इमारती रिकाम्या न करता त्यांची रचनात्मक दुरुस्ती करता येणे शक्य आहे, तर ६१ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. दहा ठिकाणी नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती होत आहे, तर चार इमारती अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य असल्याचे सर्वेक्षण पथकाच्या निदर्शनास आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT