MLA Manjula Gavit and Dr. Tulshiram gavit taking approval of Pimpalner Gram Panchayat from Chief Minister Eknath Shinde.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर

Dhule : ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले असून, महाराष्ट्र शासनाचे राजपत्र २२ फेब्रुवारी २०२४ ला प्रसिद्ध झाले असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी आज प्रसिद्धीस दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील १०१ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले असून, महाराष्ट्र शासनाचे राजपत्र २२ फेब्रुवारी २०२४ ला प्रसिद्ध झाले असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी आज प्रसिद्धीस दिले आहे.

त्यांनी म्हटले आहे, की मी आमदार झाल्यापासून पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्न करीत होते. (Conversion of Pimpalner Gram Panchayat into Municipal Council)

तीन वर्षांच्या माझ्या प्रयत्नांना आज यश प्राप्त झालेले आहे. पिंपळनेरवासीयांना संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सप्रेम भेट दिली आहे. मी दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याने मला समाधान होत आहे.

पिंपळनेर शहराची वाढती लोकसंख्या, नवीन होत असलेल्या वसाहती यांना ग्रामपंचायत मूलभूत सुविधा म्हणजेच रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा पुरवू शकत नव्हती; नगर परिषद झाल्याने या सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.

स्थानिक रहिवासीयांची, लोकप्रतिनिधींची ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, व्यापारी संघटना यांची गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यतेचे आदेश शासनाने पारित केले आहेत.

पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर व्हावे म्हणून मी मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे २७ सप्टेंबर २०२१ ला प्रथम प्रस्ताव दिला आणि आज १०१ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी मंजूर केला आहे.

नगर परिषदेत रूपांतर झाल्याने हद्दवाढ होईल. रस्ते, पूल, मोऱ्या, पथदीप पिण्याच्या पाण्याची सोय आदी कामांसाठी विकासाचे दालन खुले होणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी व्यक्त केली.

नगर परिषदेच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री यांच्याकडून भरघोस निधी उपलब्ध करून घेऊ व पिंपळनेर शहराच्या विकासात भर घालू, असे पिंपळनेरवासीयांना शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित व आमदार मंजुळा गावित यांनी आश्वासित केले.

नगर परिषदेत रूपांतर होण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व त्यांचे सर्व सहकारी, तसेच पिंपळनेर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, साक्री तालुक्यातील सर्व अधिकारी, मंत्रालयातील उपसचिव, प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारीवृंद आणि मुखामंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार मंजुळा गावित व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानले.

"राष्ट्रीय संत गाडगे महाराज जयंतीदिनी पिंपळनेरवासीयांना सप्रेम भेट दिली. पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे जाहीर आभार." - मंजुळा गावित, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT