mob attack esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : पोलिसांवर हल्ल्याचा जमावावर गुन्हा दाखल! भाटपुऱ्यातील खून प्रकरणाचे पडसाद; तब्बल 80 जण आरोपी यादीत

Crime News : हल्ल्याची घटना आठ मेस रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान भाटपुरा (ता. शिरपूर) येथे घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : खुनाच्या संशयितांना ताब्यात देण्याची मागणी करुन पोलिसांवर हल्ला केल्याच्या संशयावरुन सुमारे ८० जणांच्या जमावाविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्याची घटना आठ मेस रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान भाटपुरा (ता. शिरपूर) येथे घडली होती. (Dhule Crime case filed Bhatpura murder case fallout news)

भाटपुरा येथे मद्याच्या नशेत आई-वडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरु पंढरीनाथ चौधरी याला त्याचा मेव्हणा नितीन चौधरी व मनोज चौधरी यांनी मारहाण केली होती. या घटनेत पंढरीनाथचा मृत्यू झाला. त्यानंतर थाळनेर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळी मोठा जमाव आल्याचे पाहून शिरपूर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. संशयितांना ताब्यात देण्याची मागणी जमावाने करुन पोलिसांवर दगडफेक केली. (latest marathi news)

घटनेत थाळनेरचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, शिरपूरचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील, उपनिरीक्षक दिलीप पवार, शेख, हवालदार रामोळे व आरसीपी पथकातील अंमलदार जखमी झाले. अश्रूधूर सोडून जमावाला पांगवणे भाग पडले होते. पोलिसांवर हल्ला, पोलिसांच्या वाहनाचे नुकसान, दंगलीच्या संशयावरुन अजय कोळी, हिंमत राजपूत, त्याचा मुलगा, आलिशान भिल, निंबा कोळी याचा मुलगा, दत्तात्रय देवरे, जितेंद्र गुजर, भाईसाहेब देशमुख, दरबार राजपूत, धर्मा कोळी, राजेंद्र राजपूत याचा मुलगा, भिकन मोरे याचा मुलगा, रोहिदास भिल, दरबार वंजारी, प्रकाश वंजारी, पिंटू भिलचा भाऊ व अन्य ७० ते ८० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक दिलीप पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : SIR वरून निवडणूक आयोगात मतभेद?, आयोगाकडून स्पष्टीकरण; दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप घेतल्याचा दावा

Job Fair: दहावी पास तरुणांना LIC सह १८ कंपन्यांत थेट मुलाखतीतून नोकरीची संधी! फक्त एकच अट, कसा करायचा अर्ज ?

Ausа Drought Crisis : देवाभाऊ, शेतकऱ्यांसाठी देवदूत बना! दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टाहो

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

SCROLL FOR NEXT