Police inspector Dhananjay Patil and team with items seized from suspected woman
Police inspector Dhananjay Patil and team with items seized from suspected woman  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सोनपोत चोर 2 महिलांना बेड्या; एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : बसमध्ये चढणाऱ्या वृद्ध महिलेची सोनपोत लांबविणाऱ्या टोळीचा देवपूर पोलिसांनी गुरुवारी (ता. १४) पर्दाफाश केला. चंदनपुरी (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील दोघा सराईत महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ८० हजारांच्या दोन सोनपोतही हस्तगत केल्या.

धुळे शहरातील सावरकर पुतळा येथे शिरपूर-धुळे बसमधून उतरताना सुशीलाबाई खंडू ठाकूर (वय ७०) यांच्या पर्समधील तीन तोळे सोन्याची पोत चोरट्यांनी २१ फेब्रुवारीला दुपारी दोनच्या सुमारास लंपास केली होती. (Dhule crime Chain thief 2 women shackled One lakh 80 thousand worth of goods seized)

याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी शोधपथकाला घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे सोनपोत चोरणाऱ्या दोन सराईत महिला चंदनपुरी (ता. मालेगाव) येथील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पथक त्यांच्या मागावर होते. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या दोघी धुळे शहरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पथकाने चाळीसगाव रोड चौफुलीवर सापळा रचून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.

त्यांनी एस. ए. सकट (५५) व एस. बी. एस. लोंढे (६०, रा. चंदनपुरी, ता. मालेगाव) अशी नावे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील तीन तोळ्याची सोनपोत विकण्यासाठी आम्ही धुळ्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून प्रत्येकी ९० हजारांच्या तीन तोळ्याच्या दोन पोती हस्तगत केल्या. दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी अन्य महिलांचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, राजेश उंदवे, साईनाथ तळेकर, मिलिंद सोनवणे, गुलाब आखाडे, पंकज चव्हाण, विश्वनाथ शिरसाट, राहुल गुंजाळ, सौरभ कुटे, चारुशीला शिरसाट, मनीषा बागड, आरती दिवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT