Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : माजी मंत्र्यांसह इतरांवर दोंडाईचा पोलिसांत गुन्हा

Crime News : यासंदर्भात माजी मंत्री डॉ. देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की प्रदीप शिंदे यांनी त्यांना जीवे मारण्याचा कट करून त्यांच्यावर मारेकरी घातले, अशी तक्रार माझ्यासह पाच जणांवर दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : कायदेशीर लढाईतील एक शैक्षणिक याचिका मागे घेण्यासाठी माजी मंत्र्यांसह पाच साथीदार व इतर सात ते आठ जणांनी ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला, अशा आशयाची फिर्याद माजी मंत्र्यांचे जखमी भाचे प्रदीप शिंदे यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार संशयितांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. (Ex minister others been charged with fraud)

दोंडाईचा पोलिसांत एसएसव्हीपीएस संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, डॉ. रवींद्र देशमुख, सचिव अमित पाटील, प्रतीक देशमुख, संस्थेचे कामकाज पाहणारे धनराज चौधरी यांनी संगनमताने सात ते आठ जणांच्या मदतीने ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचे जखमी शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

संशयितांनी पाय, तोंड, पोट, छाती, हातावर मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. उपनिरीक्षक हेमंत राऊत तपास करीत आहेत. यासंदर्भात माजी मंत्री डॉ. देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की प्रदीप शिंदे यांनी त्यांना जीवे मारण्याचा कट करून त्यांच्यावर मारेकरी घातले, अशी तक्रार माझ्यासह पाच जणांवर दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिली आहे. (latest marathi news)

त्यांनी नैराश्‍यातून फिर्याद दिलेली असावी. त्यांच्याशी आमचे कसलेही वाद नाहीत. ते आमचे भाचे आहेत, त्यांना व त्यांच्या पत्नीला सेवा मिळवून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला असेल तर त्याचे कारण पोलिसांनी शोधावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT