Srikanth Dhiware, Hrshikesh Reddy, Suresh Shirasat and team present during the inspection in the fake liquor case. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त! 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime : पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने वार (ता. धुळे) शिवारात एका शेतातील घरात सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना छापा टाकत उद्ध्वस्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने वार (ता. धुळे) शिवारात एका शेतातील घरात सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना छापा टाकत उद्ध्वस्त केला. या कारवाईत चार लाख ३० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच संशयिताला ताब्यात घेतले. कारखाना मालकाचाही शोध सुरू आहे. वार शिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांना मिळाली. ()

त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार श्री. शिरसाट यांनी पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, हवालदार कुणाल साळवे, पंडित मोरे, हवालदार सुनील राठोड, सनी सरदार, अतुल जाधव, किरण भदाणे, अमोल सोनवणे, वाल्मीक पाटील तसेच आझादनगर पोलिस ठाण्याचे हवालदार गौतम सपकाळ यांच्यासह मध्यरात्रीनंतर घटनास्थळी छापा टाकला. त्या ठिकाणी शरीरास घातक व अपायकारक असे देशी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य आढळले.

घटनास्थळी दोन लाखांचे सिलींग पॅकिंगची इलेक्ट्रीक मशिन, ५० हजारांचे दुसरे मशिन, ६३ हजार ८४० किमतीचे टँगो नाव असलेल्या सीलबंद दारूच्या बाटल्या भरलेले ३८ खोके, आठ हजार १६० रुपयांचे टँगो नावाच्या रिकाम्या बाटल्यांचे ३४ बॉक्स, दोन हजारांचे पत्रटी बूट, २० हजारांचे इलेक्ट्रीक मशिन, वीस हजारांची ७५० लिटर क्षमतेची प्लॅस्टिकची टाकी व त्यात सुमारे शंभर लिटर दारू, चाळीस हजारांचे दोनशे लिटर क्षमतेचे ड्रम व त्यात सुमारे दोनशे लिटर रसायन, इतर साहित्य मिळून एकूण चार लाख ३० हजार ८५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी महेंद्र राजाराम चव्हाण (वय २४, रा. वार) याला ताब्यात घेतले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक ह्रषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT