Gutkha seized by the police and the suspect. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सोनगीर फाट्यावर कारवाईत 5 लाखांचा गुटखा जप्त

Dhule Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह संशयिताला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे पाच लाखांचा गुटखा व दहा लाखांचे वाहन असा सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह संशयिताला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे पाच लाखांचा गुटखा व दहा लाखांचे वाहन असा सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवारी (ता. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास सोनगीर फाट्यावर ही कारवाई झाली. (Dhule Crime Gutkha worth 5 lakhs seized in operation at Songir Phata)

दिल्लीहून महाराष्ट्रात गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांनी सोनगीर फाट्याजवळ सापळा लावला. सायंकाळी सोनगीरकडे येणारा ट्रक (एनएल ०१, एडी ९९३८) थांबवून तपासणी केली असता त्यात दहा पोत्यांत सुमारे चार लाख ९२ हजार ४८० रुपये किमतीचा राज्यात प्रतिबंधित एसएचके गुटखाची पाकिटे आढळून आली.

गुटखा व दहा लाखांचे वाहन असा १४ लाख ९२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित वाहनचालक ब्रजेशकुमार श्रीअशोक यादव (वय २९, रा. दुर्गापूर, शेरवान, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) यास अटक करण्यात आली.

अन्नसुरक्षा प्रशासन अधिकारी किशोर बाविस्कर यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक सुकदेव धरम तपास करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे.

उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक रवींद्र महाले, सुकदेव धरम, पोलिस अविनाश कराड, प्रदीप धिवरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT