Dhule Crime News : शहरातील शुभम साळुंखे खून प्रकरणातील एका फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जेरबंद केले. तो बेलापूर (नवी मुंबई) येथे आपली ओळख लपवून एका कंपनीत काम करत होता. तर याच गुन्ह्यातील आरोपी विनोद थोरात यास लपण्यासाठी मदत करणाऱ्या त्यांच्या मुलालाही बेड्या ठोकण्यात आल्या.
धुळे शहरातील गोल चौकी परिसरात ८ ऑक्टोबर २०२३ ला शुभम साळुंखे या तरुणाचा पूर्व वैमनस्यातून खून झाला होता. (Dhule Crime LCB arrests one in Shubham Salunkhe murder case)
याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल असून गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यान्वये (मोक्का) वाढ करण्यात आली असून सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
गुन्ह्यात यापूर्वी सात आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील इतर आरोपी अटक टाळण्यासाठी आपली ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांचा शोध सुरू होता.
२९ फेब्रुवारीला एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना गुन्ह्यातील आरोपी हर्षल रघुनाथ चौधरी (वय-२८, रा. हमाल मापाडी प्लॉट, कृष्णावाडी, धुळे) हा बेलापूर, नवी मुंबई येथे ओला कंपनीमध्ये स्वत:ची ओळख लपवून काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला तेथून ताब्यात घेत अटक केली.
तसेच या गुन्ह्यातील आरोपी विनोद रमेश थोरात याला लपण्यासाठी त्याचा मुलगा परेश विनोद थोरात (वय-२२, रा. मनमाड जीन, पाण्याची टाकीजवळ, धुळे) हा मदत करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यालाही ३ मार्चला अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.