Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : शिरपुरात ‘आयजीं’च्या विशेष पथकाचा छापा; दोन लाखांची रोकड, 15 दुचाकी जप्त

Crime News : घटनास्थळावरून सव्वादोन लाख रुपयांची रोकड, १५ दुचाकी व इतर असा एकूण १० लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : शिरपूर बायपास रस्त्यावरील बंगल्यात सुरू असलेला जुगाराचा अड्डा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाने उद्‍ध्वस्त केला. १४ जुलैला रात्री साडेदहाला केलेल्या या कारवाईत ३१ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून सव्वादोन लाख रुपयांची रोकड, १५ दुचाकी व इतर असा एकूण १० लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Dhule Crime Raid by special team of IG in Shirpur)

शिरपूर बायपास रस्त्यावर नवजीवन किराणा दुकानामागे एका बंगल्यातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळविण्यात येत असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून पथकाने छापा टाकला.

बाबूराव खैरनार यांच्या मालकीच्या बंदिस्त बंगल्यामधील पत्र्याच्या शेडमध्ये झन्नामन्ना जुगार खेळताना ३१ जण आढळले. त्यांच्याकडून दोन लाख ३० हजार रुपये रोख, १५ दुचाकी, चार मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण दहा लाख ३१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (latest marathi news)

संशयितांमध्ये उदय पाटील, योगेश शिंपी, अमोल माळी, अझीम बेग युनूस बेग, रंकेश गोडसे, सुनील खैरनार, किरण पारधी, मोहसीन मेहतर, कमलसिंह यादव, संजय पाटील, प्रवीण मराठे, बाबूराव खैरनार, संदीप पाटील, गणेश पाटील, दिलीप राजपूत, अभिषेक अहिरे, प्रवीण पाटील, गणेश धाकड, समाधान पाटील, आकाश चौधरी, मनीष पाटील, सुनील बोडसे, शोकीन कुवर, महेश कोळी, रवींद्र भोई, अतुल पाटील, रवींद्र पावरा, सनी पाटील, रवींद्र साळवे यांचा समावेश आहे. पोलिस नाईक प्रमोद मंडलिक यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

Marathi News Live Updates : जनता वसाहतीत सराईत गुन्हेगारांसह तिघे अल्पवयीन ताब्यात; 12 धारदार शस्त्रे जप्त

SCROLL FOR NEXT