A team of 'LCB' along with the seized stock of fake liquor and the suspect. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : पाण्याच्या बाटल्यांआड बनावट दारूची वाहतूक! LCB च्या कारवाईत साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News : पथकाने वाहनासह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला, तसेच या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : पाण्याच्या बाटल्यांआड बनावट दारूची वाहतूक करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. पथकाने वाहनासह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला, तसेच या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. (Dhule Crime Trafficking fake liquor under water bottles)

पांढऱ्या रंगाच्या वाहनातून (एमएच १५, सीके २५२७) धुळे शहरातून चाळीसगाव रोड चौफुलीमार्गे दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चाळीसगाव रोड चौफुलीजवळील भागीरथी इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ संशयित वाहनाला पकडले.

तसेच गणेश नारायणराव निकम (वय ४५, रा. सहजीवननगर, धुळे) यास ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता त्यात पाण्याच्या बाटल्यांच्या बॉक्सखाली बनावट दारूचे बॉक्स मिळून आले. एकूण पाच लाख २५ हजार रुपये किमतीचे देशी दारूचे ९० मिलिलिटरचे एकूण १५० बॉक्स, २२ हजार ८०० रुपये किमतीच्या पाण्याच्या बाटल्या व दोन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण सात लाख ४७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. (latest marathi news)

या प्रकरणी गणेश निकम याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, योगेश साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT