Rajvardhan Kadambande present at the airport. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विमान पाठवून कदमबांडे यांना बोलावले; शाहू महाराजांचे वारस; मोदींच्या कोल्हापूरमधील सभेस उपस्थित

Dhule News : माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारस असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारस असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली. त्यांनी खास विमान पाठवून श्री. कदमबांडे यांना शनिवारी (ता. २७) कोल्हापूर येथे बोलावून घेतले. (Dhule News)

तेथील पंतप्रधान मोदी यांच्या सभेत श्री. कदमबांडे यांना सहभागी करून घेतले. श्री. कदमबांडे हे शाहू महाराजांचे वारस आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त कोल्हापूर येथे शनिवारी प्रचारासाठी गेलेले मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ही माहिती मिळाली. त्यांनी विशेष विमान धुळ्यास पाठवून श्री. कदमबांडे यांना कोल्हापूर येथे सन्मानपूर्वक आणावे.

अशी सूचना यंत्रणेला दिली. तांत्रिक अडचणीमुळे विशेष विमान धुळ्याऐवजी जळगाव येथील विमानतळावर उतरविण्यात आले. तेथून श्री. कदमबांडे हे सायंकाळी पावणेपाचनंतर कोल्हापूरला रवाना झाले.

ते थेट पंतप्रधान मोदी यांच्या सभास्थळी पोहोचले. साडेपाचनंतर मोदी यांची सभा संपली. पंतप्रधान मोदी यांनी श्री. कदमबांडे यांच्याशी चर्चा केली. नंतर प्रचाराच्या कामास लागावे, अशी सूचना श्री. कदमबांडे यांना केली.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही श्री. कदमबांडे हे शाहू महाराजांचे वारस असल्याचे कळल्यावर माहिती घेत त्यांच्याशी चर्चा केली. राजकीय वाटचालीत हा अविस्मरणीय अनुभव असल्याची प्रतिक्रिया श्री. कदमबांडे यांनी `सकाळ`शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT