RTE Admission  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule RTE Admission Process : ‘आरटीई’ प्रवेशासाठी नव्याने अर्ज आवश्‍यक : शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे

Dhule News : धुळे जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षांसाठी २५ टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule RTE Admission Process : २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी दुर्बल व वंचित घटकातील बालकांना शाळेत आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी यापूर्वीच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे पालकांनी नव्याने ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. ३१ मे २०२४ पर्यंत हे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुरेखा देवरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. (Dhule Fresh application required for RTE admission)

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंयअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महापालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यित) या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षांसाठी २५ टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांनी १७ ते ३१ मे २०२४ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

प्रवेशासाठी सूचना

पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग स्तरावर २५ टक्के प्रवेशप्रक्रियेसाठी पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, प्रवेशासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो, २५ टक्के प्रवेशप्रक्रियेकरिता दहा शाळांची निवड करावी, पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल. (latest marathi news)

त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे अचूक लोकेशन नमूद करावे, प्रवेशप्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याशी संपर्क साधावा, एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू नये, तात्पुरता प्रवेश दिल्याच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत बालकांचे आधारकार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील.

‘त्या’ अर्जांचा विचार नाही

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

त्यामुळे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ टक्क्याअंतर्गत यापूर्वी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जाचा २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

SCROLL FOR NEXT