Primary Health Centre esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्ह्यात 41 आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष

Dhule : जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली. जिल्ह्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्यावर गेल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत असून, त्याचा शरीरावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Dhule Heat stroke room in 41 health centers in district)

मार्चमध्ये अशी स्थिती असून, एप्रिल व मेमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वतंत्र उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडके यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना उष्माघात कक्ष कार्यान्वित करून सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्याबाबत सूचित केले.

हवेशीर खोली, पुरेसा औषधसाठा, कक्षात पंखे, कूलरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उष्माघाताने होणारे मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये पुरेपूर उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हवामान खात्याने उष्णतेत वाढ होण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २७) अधिकाऱ्यांची बैठक घेत आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने यंत्रणेकडून कार्यवाही होत असल्याचे दिसते. (latest marathi news)

उष्माघाताची लक्षणे

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, चक्कर येणे, उलटी, मळमळ होणे, थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, शरीराचे तापमान वाढणे, तसेच पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे, पाय दुखणे, डोके दुखणे, निरुत्साही वाटणे.

अशी घ्या काळजी

दुपारनंतर उन्हात जाणे टाळावे, सकाळी व सायंकाळच्या कमी उन्हात कामे आटोपावीत. सातत्याने पाणी पीत राहावे, गॉगल, छत्री, टोपी घालावी किंवा पांढऱ्या सुती रुमालाने डोके झाकावे, काळे व भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. तसेच सैल व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, आरोग्यास अपायकारक असलेली शीतपेये शक्यतो टाळावीत. त्यापेक्षा लिंबूपाणी, ताक, मठ्ठा, चिंचेचे पन्हे, कैरी पन्हे इत्यादींचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT