Upper Tehsil Office. Talathi office in closed state. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दोंडाईचा अपर तहसीलअंतर्गत अवैध गौण खनिज वाहतूक; नेमणुकीच्या ठिकाणी कर्मचारी गायब

Dhule News : दोंडाईचा अपर तहसील कार्यालयांतर्गत जवळपास ४७ गावांचा कारभार चालतो. यात ३५ सज्जा आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दोंडाईचा अपर तहसील कार्यालयांतर्गत जवळपास ४७ गावांचा कारभार चालतो. यात ३५ सज्जा आहेत. दोंडाईचा परिसरात अवैध गौण खनिजाची दिवसरात्र वाहतूक सहा महिन्यांपासून सुरू असून, महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रेती व मुरमाची वाहतूक सुरू होती हे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसू नये? दोंडाईचा मंडळ कार्यालयांतर्गत ४७ गावे येतात. (Illegal secondary mineral transportation under Upper Tehsil of Gondia )

त्या ठिकाणी तापी नदीपात्रातून गावालगतच्या नदीपात्रातून सर्रास रेती वाहतूक केली जाते, तसेच मुरमाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक परिसरातून सुरू आहे. मात्र कारवाई न होत असल्याने अधिकारी व कर्मचारी सुस्त असल्याचे चित्र आहे.

कर्मचारी येतच नाहीत

महसूल विभागाचे कर्मचारी गावात नेमणुकीच्या ठिकाणी वेळेवर येत नसल्याने परिसरात कर्मचारी धुळ्यासह अनेक ठिकाणांहून ये-जा करतात. काही तर घरी बसून व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवितात की ‘मी आज येत आहे, मी आज येणार नाही, आज मीटिंग आहे.’ कोणताही अंकुश राहिलेला नाही, तसेच ग्रामीण भागातही गौण खनिजमाफियांचा त्यांच्याशी ‘अर्थ’पूर्ण व्यवहार असल्याची चर्चा परिसरात असून, त्यामुळे वाहतूक जोरात चालत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.

आता मात्र पथकच गायब झाल्याने कारवाई करेल कोण? तसेच संबंधित तलाठी गावावर येण्याची-जाण्याची वेळ निश्चित नाही. काही वेळेस चार-पाच दिवस गावाकडे फिरकत नाही अशी स्थिती अनेक दिवसांपासून असून, आले तर गावातील ठराविक जणांना दर्शन झाले की तेथून घरी. मग सर्वसामान्य जनतेची कामे होतील कशी? तलाठ्यांच्या कार्यालयाचा दिवस व वेळ निश्चित करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. (latest marathi news)

व्हॉट्सॲप ग्रुपवरून कामकाज

अनेक गावांत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपवर घरी बसून सूचना दिल्या जातात. तसेच ग्रुपवर मी येत आहे, मी मीटिंगला आहे, कुणी फोन करू नये, आज ऑफिसच्या कामाला आहे, असे मेसेज येतात. गावातील काही निवडक लोकांना हाताशी धरून कामे करत असून, उर्वरित सर्वसामान्य शेतकरी, आबालवृद्ध ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत अशा सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. वरिष्ठांनी प्रत्येक गावात भेट देणे गरजेचे आहे.

नेमणुकीच्या अनुपस्थिती

महसूल विभागाचे कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी येत नसल्याने सर्वसामान्य माणसाची कामे होत नाहीत. त्यांना सरळ दोंडाईचा कार्यालयात बोलविले जाते. सर्वसामान्य व्यक्तींना वेळ देता येत नाही अशी स्थिती दोंडाईचा अपर तहसील कार्यालयांतर्गत आहे. वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने अशी स्थिती झाल्याचे चित्र आहे. याकडे गांभीर्याने लक्ष घालावे व महसूल यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

अपर तहसील कार्यालयाची स्थिती

सज्जे ३५

मंडळ ६

गावे ४७

तलाठी १२

मंडळ अधिकारी ६

''एका तलाठ्याकडे तीन ते चार सज्जे आहेत. मी वाढीव कर्मचारी वर्गाची मागणी केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत कर्मचारी वर्गात वाढ झाल्यास इतरत्र भार कमी होईल व सर्व अडचणी दूर होतील.''-संभाजी पाटील, अपर तहसीलदार, दोंडाईचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Tweet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या फोटोसह संजय राऊतांचे खरमरीत ट्वीट, 'खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय...' राजकीय वातावरण तापलं

Pune Voter List: पुण्यात मतदार यादीत मोठी कपात! ११ लाख मतदार बेपत्ता, २ लाख मृत; प्रारूप यादी २४ ऑगस्टला

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 17 ऑगस्ट शेवटची तारीख

Marathi News Live Updates : लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपाल दोषी, मुंबई हायकोर्टाने दिला निकाल

Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

SCROLL FOR NEXT