Dhule Lok Sabha Constituency  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : ...अन्‌ झाले मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण! भाजपची रणनीती फसली

Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील यंदाची निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक आणि ‘कॉंटे की टक्कर’ ठरली.

निखिल सूर्यवंशी

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील यंदाची निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक आणि ‘कॉंटे की टक्कर’ ठरली. तीत कॉंग्रेसकडून भाजपचा अनपेक्षित पराभव झाला. या पराभवाची कारणमीमांसा करण्यात भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि चिकित्सक धुळेकर गुंतलेले आहेत. भाजपकडून विजयासाठी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. परंतु, अशी रणनीती फसली आणि प्रत्यक्षात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्याने भाजपच्या उमेदवाराचा विजय हुकला, असा ठाम निष्कर्ष राजकीय विश्‍लेषक काढत आहेत. (Lok Sabha election constituency turned out to be very exciting )

धुळे लोकसभा मतदारसंघात १८ उमेदवार नशीब अजमावत होते. परंतु, मुख्य लढत भाजप महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये होती. रिंगणात यंदा वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाचा उमेदवार नव्हता. त्यामुळे मुस्लीम, दलित, आदिवासी समाजाच्या मतांचे विभाजन टळून त्याचा काँग्रेसला लाभ होणार हे स्पष्टच होते. चार जूनला रात्री साडेअकराला अधिकृतपणे काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव या ३ हजार ८३१ मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचा अनपेक्षित पराभव झाला. दहा वर्षांतील कारकिर्दीत डॉ. भामरे यांना पक्षाने संरक्षण राज्यमंत्रिपद दिले. देशात भाजपसह मोदी फॅक्टरचा सर्वत्र असलेला पगडा पाहता डॉ. भामरे विजयी होतील, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु, डॉ. भामरे यांची निसटत्या मतांनी हॅटट्रीक हुकली.

हिंदू मतांचे ध्रुवीकरण

भाजपकडून धुळे मतदारसंघातील या निवडणुकीत हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मालेगाव शहरात झालेली सभा डॉ. भामरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे आणि तेथेच भाजपची रणनीती फसल्याचे ठाम मत राजकीय विश्‍लेषकांकडून निकालापूर्वीच मांडले जाऊ लागले. (latest marathi news)

कारण मालेगाव शहर वगळता इतर धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव बाह्य, बागलाण या पाच विधानसभा मतदारसंघांत डॉ. भामरे यांना अधिकची मते मिळाली आहेत. यावरून धुळे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात डॉ. भामरे यांना मिळालेल्या मतांवरून पराभवानंतर कारणमीमांसा केली जात आहे.

काय म्हणते आकडेवारी?

डॉ. भामरे यांना धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ६४ हजार २३९, धुळे शहरात ४ हजार ८२४, शिंदखेडा मतदारसंघात ४३ हजार ४२५, मालेगाव बाह्य मतदारसंघात ५५ हजार २१२, बागलाण विधानसभा मतदारसंघात २१ हजार ९१३ मतांचा ‘लीड’ मिळाला आहे. या मतांची बेरीज केली, तर ती १ लाख ८९ हजार ६१३ होते.

मालेगाव मध्य मतदारसंघात डॉ. बच्छाव यांना जास्तीची १ लाख ९४ हजार ३२७ मते मिळाली आहेत. त्यात डॉ. भामरे यांना केवळ ४ हजार ५४२ मते मिळाली. मालेगाव शहरात मिळालेली ही अल्पशी मते आणि धुळे शहरात त्यांना मिळालेली ४ हजार ८२४ अधिकची (लिड) मते डॉ. भामरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.

मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रश्‍न

डॉ. भामरे हे पाच मतदारसंघांत मतांच्या आघाडीवर राहिल्याने भाजपकडून ही निवडणूक हिंदू-मुस्लिम या सूत्रावर उभारल्याचे दिसून येते. कडवे हिंदुत्ववादी, अशा प्रतिमेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची धुळे शहरात सभा झाली, तर कडवे हिंदू, बुलडोझर बाबा अशी ओळख असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मालेगाव शहरात सभा झाली.

याव्दारे भाजपकडून हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. परंतु, या रणनीतीमुळे अप्रत्यक्षपणे मालेगाव, धुळे शहर, दोंडाईचा व मतदारसंघातील इतर ठिकाणच्या मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाल्याचे विश्‍लेषक सांगतात. आता या पराभवातून भाजप काय बोध घेणार हे आगामी विधानसभा निवडणुकीवेळी दिसेल.

पराभवास असेही एक कारण....

धुळे शहरात महापालिकेवर भाजपची सत्ता होती आणि ती प्रशासक नियुक्तीनंतर अप्रत्यक्षपणे आहे. महापालिकेत भाजपचे ५० नगरसेवक असूनही डॉ. भामरे यांना एक लाख मते का मिळाली नाही, असा प्रश्न विश्‍लेषकांकडून उपस्थित होतो.

यात कार्यकाळ संपुष्टात आलेल्या अनेक नगरसेवकांनी प्रचाराचे कामकाज करण्यास टाळाटाळ केली असावी किंवा पक्षासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्वीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले गेले असावे, असेही एक कारण मांडले जाते. त्यामुळे शहरातून भाजपला अपेक्षित मतांचा लीड मिळू शकला नसल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT