On the first day of school, teachers and students celebrate the joint entrance ceremony of school number one and two. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कापडणे-सोनगीर-नेरच्या शाळांचेच एकत्रीकरण का? समान न्याय हवा

Dhule : धुळे जिल्हा परिषदेने एकाच आवारातील दोन किंवा दोनपेक्षा अधिक शाळांचे रुपांतर एकाच शाळेत करण्याची प्रक्रीया मार्चपासून सुरु केली.

जगन्नाथ पाटील

Dhule News : धुळे जिल्हा परिषदेने एकाच आवारातील दोन किंवा दोनपेक्षा अधिक शाळांचे रुपांतर एकाच शाळेत करण्याची प्रक्रीया मार्चपासून सुरु केली. यात पंधरा गावातील शाळांचा समावेश होता. प्रत्यक्षात तीनच गावातील शाळांचे जबरदस्ती एकत्रीकरण १५ जूनपासून केले आहे. पंधरा शाळा पटलावर असतांना तीनच गावातील शाळा का एकत्रीत केल्या आणि इतर बारा गावांकडे का दुर्लक्ष केले, असा सवाल शैक्षणिक वर्तुळातून विचारला जात आहे. (integration of schools of Kapadne Songir and Ner need equal justice )

धुळे जिल्हा परिषदेने अवधान, मोघण, शिरूड, सोनगीर, बोरीस, नेर, कापडणे, मालपूर, चिमठाणे, रुदावली, वर्षी, वारुड व नरडाणा येथील एकाच आवरात भरणाऱ्‍या शाळांचे एकाच शाळेत रूपांतर करण्याचा ठराव पारीत केला होता. मार्चमध्ये शाळा एकत्रीकरणाचा ठराव करण्यापूर्वी शालेय व्यवस्थापन समितीकडूनच शाळा एकत्रीकरणाचा ठराव मागून घेतला होता.

हा ठराव घेण्यापूर्वी त्यात्या शाळांच्या मुख्याध्यापकांना जबरदस्तीने कामाला लावून घेतले होते. सर्वच शाळा ठराव देताहेत, तुम्ही का देत नाहीत, असे म्हणत एकाअर्थी धमकीवजा प्रेमाने ठराव करून घेतले होते. तेच ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत ठेवून पारीत करुन घेतले. (latest marathi news)

मग तीनच गावे का?

पंधरा गावांतील शाळा एकत्रीकरणाचे ठराव झालेले आहेत. पुन्हा मे महिन्यात झालेल्या बैठकीत आठ गावांतील शाळा एकत्रीकरणाचे आदेश झाले. प्रत्यक्षात १५ जुलैपासून कापडणे, सोनगीर आणि नेर येथील शाळा एकत्रित करण्यात आल्या आहेत. ही तीनच गावे का, इतर पंधरा गावातील शाळांकडे दुर्लक्ष का करण्यात आले असे प्रश्‍न शिक्षणप्रेमी व पालकांमधून उपस्थित होत आहेत.

ती गावे नेत्यांची?

कापडणे, नेर व सोनगीर वगळता इतर बारा गावातील नेत्यांचे जिल्हा परिषदेत वजन आहे. त्यांच्या गावातील वजन टिकून राहण्यासाठी त्यांनी एकत्रिकरणास तोंडी विरोध केला आहे. प्रशासनाने त्यांच्या शंकाचे निरस्सन केले नाही अन् या तीन गावांतील शाळांवर अन्याय केल्याचे गुरुजींमध्ये चर्चिले जात आहे. दरम्यान, शाळा एकत्रीकरण करायच्या आहेत, तर मग त्या बारा शाळांचाही तत्काळ समावेश करा. समान न्याय हवा. अन्यथा, या तीन गावांतील एकत्रीकरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT