Dhule Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : निवडणूक खर्च निरीक्षकांतर्फे मालेगाव, बागलाणचा आढावा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण मतदारसंघाचा खर्च विषयक आढावा घेतला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण मतदारसंघाचा खर्च विषयक आढावा घेतला. मतदारसंघाची २० मेस निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. (Dhule Lok Sabha Constituency)

या मतदासंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्च निरीक्षक जाधव यांनी मालेगाव, बागलाण येथे भेट देऊन पाहणी केली. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, बागलाणचे सहायक निवडणूक अधिकारी बबनराव काकडे.

मालेगाव बाह्यचे नितिन सदगीर, मालेगावचे तहसीलदार नितिनकुमार देवरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक इंगळे, विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक खर्च अधिकारी उपस्थित होते. (Latest Marathi News)

खर्च निरीक्षक जाधव यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त होण्यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बैठे व फिरते पथक यांनी आयोगाच्या निर्देशानुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. खर्च विषयक नोंदणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे.

उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून उमेदवाराचा प्रत्येक खर्च नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. त्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी, मतदार संघात येणाऱ्या वाहनांची काळजीपूर्वक तपासणी करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT