Collector Abhinav Goyal interacting with Borse family. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ‘दारोदारी’!

Dhule : धुळे लोकसभेसाठी २० मेस मतदान होणार असल्याने जिल्हाधिकारी अभिनव गोयल कुठल्याही कामानिमित्ताने जिल्ह्याच्या दौऱ्यावर असले तर आवर्जून ग्रामस्थांशी संपर्क करत असतात.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेसाठी २० मेस मतदान होणार असल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल कुठल्याही कामानिमित्ताने जिल्ह्याच्या दौऱ्यावर असले तर आवर्जून ग्रामस्थांशी किंवा नागरिकांशी संपर्क करत असतात. (Dhule Lok Sabha Election Collector is working to increase voting percentage)

असेच ते बुधवारी (ता. २१) चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील मतदान केंद्रांच्या बूथची पाहणीसाठी आले असताना त्यांनी दुसऱ्या बूथची पाहणीसाठी पायी जात असताना ओट्यावर बसलेल्या कुटुंबाची आस्थेवाईकपणे विचारपूस केले.

चिमठाणे येथे मतदान केंद्राचे चार बूथ आहेत. यातील तीन बूथ हे ‘क्रिटिकल’ असल्याने जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, अपर तहसीलदार भूषण पाटील, पोलिस निरीक्षक दीपक पाटील आदी बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाहणीसाठी आले होते. (latest marathi news)

जिल्हाधिकारी गोयल यांनी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक कन्याशाळेतील मतदान केंद्रांची पाहणी केल्यानंतर काही अंतरावरील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रांच्या पाहणीसाठी पायी जात असताना रस्त्यावरील रमेश ओंकार बोरसे पत्नीसह ओट्यावर बसलेले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी बोरसे कुटुंबाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

तुम्ही मतदान करता का, स्वस्त धान्य मिळते का, तुमच्या काही अडचणी आहेत का, असे प्रश्न विचारले. बोरसे कुटुंबाने समाधान व्यक्त केले व जिल्हाधिकारी गोयल प्रथमच आपल्या दारी आल्याने भावनिक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम? सोन्याचे भाव घसरले; आजचे नवे दर पाहा

Petrol-Diesel Rate: मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट

Satej Patil Vinay Kore Gokul politics : विनय कोरेंनी सतेज पाटलांची गोकुळमधील साथ सोडली; महायुतीचे पॅनेल करण्यावर भूमिका स्पष्ट

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT