Dhule Marathon News
Dhule Marathon News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Mahamarathon : विक्रमी 14 हजारांवर स्पर्धकांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्हास्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेसाठी मंगळवार (ता. ३१)पर्यंत तब्बल १२ हजार स्पर्धकांनी ऑनलाइन नोंदणी केली. याशिवाय दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी ऑनलाइन नोंदणी केली.

त्यामुळे या महामॅरेथॉनसाठी विक्रमी १४ हजारांवर स्पर्धकांची नोंदणी झाली.दरम्यान, या स्पर्धेला चारच दिवस उरल्याने आयोजन समितीने पूर्वतयारीला आणखी वेग दिला आहे.

धुळेकरांच्या निरामय आरोग्यासाठी आणि मॅरेथॉन स्पर्धा धुळ्याची ब्रॅन्ड होण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्यासह जिल्ह्यातील दानशूर, शासकीय यंत्रणा आणि माध्यम प्रायोजक असलेल्या ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे ५ फेब्रुवारीला येथील पोलिस ग्राउंडवर मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. नोंदणी व स्पर्धा मोफत असेल. ‘फिट धुळे, हिट धुळे’ हे मॅरेथॉनचे घोषवाक्य आहे. (Dhule Maha Marathon Entrants register at a record Fourteen Thousand only four days left for tournament preparations on fast track Dhule News)

मुख्याध्यापकांकडून ग्वाही

महामॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापकांची बैठक झाली. अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, फादर विल्सन, उदय तोरवणे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठकीत मुख्याध्यापकांनी स्पर्धकांना प्रोत्साहनाची ग्वाही दिली. स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना प्रोत्साहनासाठी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची पथके असतील. 

या स्पर्धेसाठी एक्झिक्युटिव्ह वर्किंग कमिटीतील अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, मनपा उपायुक्त विजय सनेर, अशासकीय सदस्य आशिष अजमेरा, आशिष पटवारी, दीपक अहिरे, संग्राम लिमये, डॉ. राहुल बच्छाव, निखिल सूर्यवंशी, तसेच एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, अधिकारी योगेश राजगुरू, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन आणि प्रभारी उपअधीक्षक शिवाजी बुधवंत आणि उद्योजक संदीप अग्रवाल कामकाज पाहत आहेत.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

असे गट, असा रूट

मॅरेथॉन स्पर्धेत तीन किलोमीटर कुटुंबासाठी धाव (फॅमिली रन), पाच किलोमीटर, दहा किलोमीटर, तसेच २१ किलोमीटरचा गट आहे. पोलिस ग्राउंड, बारापत्थरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून आग्रा रोडवरून मोठ्या पुलामार्गे दत्तमंदिर चौक, जिल्हा क्रीडासंकुल, गोंदूरपर्यंत विविध टप्प्यांत चार गटांतील स्पर्धक निकषानुसार अंतरावर परतीसह धावतील.

केंद्रांवरील अर्ज जमा करा

मॅरेथॉन स्पर्धेसाठी ज्या स्पर्धकांना ऑनलाइन नोंदणी करण्यास अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी धुळे शहर व जिल्ह्यातील निर्धारित केंद्रांवर विहित नमुन्यातील अर्ज ठेवण्यात आले होते. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया थांबविण्यात आल्याने संबंधित केंद्रधारकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागात विहित नमुन्यातील भरलेले अर्ज जमा करावेत. काही अडचणी असल्यास ९८८१०९०४६४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oath Ceremony Wild Animal: शपथविधीवेळी राष्ट्रपती भवनात दिसलेला 'तो' प्राणी कोण? दिल्ली पोलिसांनी काढलं शोधून

Salman Khan house firing : सलमान खानला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा! जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

T20 World Cup 2024: भारताविरुद्ध पराभवानंतरही पाकिस्तानच्या आशा जिंवत, जाणून घ्या कसे आहे सुपर-8 साठी समीकरण

Sharad Pawar: "हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कायम..."; शरद पवारांचं मोदींना नवं आव्हान

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच रंगली जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT