Former Mayor Pratibha Chaudhary while starting the work of installing paver blocks in Shivajinagar Udyan esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिवाजीनगर उद्यानात पेव्हर ब्लॉक; 5 लाखांच्या निधीतून काम

Dhule : शिवाजीनगर येथील उद्यानात माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा गुरुवारी (ता. २२) सायंकाळी सातला प्रारंभ झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील वाडीभोकर रोडवरील सर्व्हे नंबर ४१-९३/ब शिवाजीनगर येथील उद्यानात माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा गुरुवारी (ता. २२) सायंकाळी सातला प्रारंभ झाला. श्रीमती चौधरी यांच्या कार्यकाळात महापौर निधीतून या कामासाठी पाच लाख रुपये मंजूर झाले.

या कामासाठी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे माजी महापौर श्रीमती चौधरी यांच्याकडे मागणी केली होती.(Paver Block in Shivaji Nagar Udyan)

उद्यान तयार झाले असून, त्यात भगवान महादेवाचे मंदिरही उभारण्यात आले आहे. येथे पेव्हर ब्लॉक नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार श्रीमती चौधरी यांनी पेव्हर ब्लॉकसाठी निधी उपलब्ध करून दिला.

या कामाच्या प्रारंभप्रसंगी अरुणा पाटील, सीमा पाटील, रजनी अमृतकर, हर्षिता अमृतकर, ज्योत्स्ना प्रकाश पाटील, ऊर्मीला फुलपगारे, ज्योत्स्ना संदीप पाटील, लता पाटील, देवकृष्ण कुलकर्णी, पंढरीनाथ नेरकर, डॉ. सचिन आसोदेकर, रोशन धामणे, श्रीराम चौधरी, संदीप पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Jain Boarding Land : पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणात मोठी अपडेट, धर्मादाय आयुक्तांनी दिला 'हा' महत्त्वाचा आदेश

मोनालिसाचं जगप्रसिद्ध पेंटिग असलेल्या संग्रहालयात दरोडा; ४ मिनिटात नेपोलियाच्या ९ वस्तूंची चोरी, राणीचा मुकूट सापडला

Rohit Sharma: 'अरे भाई, त्याला पॉपकॉर्न नको देऊ', रोहितला कॅप्टन गिलसोबत खाताना पाहून मित्र वैतागला

खासदार बाबा की अभिनेत्री आई ? कोणाकडून वारशाने बाळाला मिळणार जास्त प्रॉपर्टी

Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून नवा वाद पेटला | Sakal News

SCROLL FOR NEXT