National Pulse Polio Vaccination esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Polio Vaccination: धुळ्यात 58 हजारांवर लाभार्थ्यांना पोलिओ डोस! 3 मार्चला लसीकरण मोहीम

Dhule News : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ३ मार्चला धुळे शहरातील ५८ हजारांवर लाभार्थी बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ३ मार्चला धुळे शहरातील ५८ हजारांवर लाभार्थी बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. धुळे शहरात यासाठी १८६ पोलिओ बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत लाभार्थी बालकांना पोलिस डोस घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. (Dhule Polio dose Vaccination campaign marathi news)

जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दर वर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते.

गेली २५ वर्षे सातत्याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्व जण योगदान देत आहात. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च-२०१४ मध्ये मिळाले आहे.

दरम्यान, पोलिओच्या समूळ उच्चाटनाच्या अनुषंगाने नेहमीप्रमाणे विशेष पल्स पोलिओ मोहीम लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ३ मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाचदरम्यान ही लसीकरण मोहीम राबविली जाईल. ज्या मुलांचे पोलिओ डोस काही कारणास्तव राहून जातील त्यांना ५ ते ९ मार्चदरम्यान आयपीपीआयअंतर्गत घरभेटी, मोबाईल टीम, ट्रान्झिट टीम, नाइट टीमद्वारे पोलिओ डोस दिला जाईल. (Latest Marathi News)

या विशेष पोलिओ लसीकरण मोहिमेचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन धुळे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. एम. आर. शेख, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी यांनी केले आहे.

येथे मिळणार पोलिओ डोस

धुळे शहरातील महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये, आपल्या घराजवळील पोलिओ बूथवर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, टोलनाका, वीटभट्टी परिसर, नाइट टीममार्फत शहरातील सर्वच भागांत एकूण १८६ पोलिओ लसीकरण बूथचे नियोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT