jaykumar rawal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : प्रकाशा- बुराई सिंचन योजनेचेही काम होणार सुरू : आमदार रावल; प्रयत्नांती 17 कोटींवर निधीची तरतूद

Dhule News : पाठपुराव्याअंती विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये याकामी १७ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा, नंदुरबार व साक्री तालुक्यातील अनेक गावांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारची सत्ता असताना या कामाला ब्रेक लागला. त्यामुळे विविध कामे बंद झालीत.

परंतु, सत्तांतरानंतर आता या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. पाठपुराव्याअंती विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये याकामी १७ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी दिली. (Dhule Prakash Burai irrigation scheme will also started MLA Rawal)

आमदार रावल म्हणाले, की शिंदखेडा, साक्री, नंदुरबार तालुक्यासाठी प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजना जीवनदायी ठरणार आहे. या योजनेचे काम महाविकास आघाडीचे सरकार असताना बंद पाडण्यात आले होते. या कामास सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर योजनेचे काम पूर्ववत होण्यासाठी 'सुप्रमा' अर्थात सुधारित प्रशासकीय योजनेची आवश्यकता होती. माझ्या पाठपुराव्याअंती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७९३ कोटींच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती.

परंतु, नंतर लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा प्रश्‍न निर्माण झाला. ही अडचण दूर होताच विधीमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी १७ कोटी १५ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे. (latest marathi news)

शिंदखेडा तालुक्यासह नंदुरबार व साक्री तालुक्यातील अनेक गावे, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती. गेल्या महाविकास सरकारने ही मान्यता दिली नाही. परंतु, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधीमंडळात स्थानिक जनतेला माझ्या माध्यमातून आश्वासन दिले होते की सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल. तो शब्द आता खरा होतोय, असे आमदार रावल यांनी सांगितले.

"विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये प्रकाशा- बुराई सिंचन योजनेसाठी १७ कोटी १५ लाखांच्या निधीची तरतूद केल्याने आता अपेक्षित कामाला पुन्हा सुरवात होईल. आमच्या भागातील ही योजना लवकरच प्रत्यक्षात साकारेल. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार."

- जयकुमार रावल, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगेत आढळलं पिस्तुल, कुणी आणि कशासाठी आणलं?

Narhari Zirwal : पीएने लाच घेण्यास सांगितल्याचा आरोप, मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून 'नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात खळबळ!

Horoscope : प्रेमाचा दिवस सुपर लकी! आज 'या' 5 राशींना होईल आर्थिक लाभ; सिंगल-कपलच्या नात्याला नवे वळण, आयुष्यातली जुनी समस्या संपणार

Mumbai Local: महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात जायचा प्लॅन करताय? लोकल वेळापत्रक पहाच, 'या' मार्गावर विशेष ब्लॉक

EPFO Pension: खासगी कर्मचाऱ्यांना पेन्शन कधी मिळते? जाणून घ्या EPS चे नियम आणि पात्रतेचे वय

SCROLL FOR NEXT