धुळे : खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार. शेजारी भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र देवरे, संजय सोनवणे यांच्यासह अन्य कार्य
धुळे : खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार. शेजारी भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र देवरे, संजय सोनवणे यांच्यासह अन्य कार्य 
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुकाध्यक्ष भाजपच्या तंबूत

भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील रुनमळी (ता. साक्री) येथील माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार गुरुवारी (ता. 15) दुपारी गावातीलच काही कार्यकर्त्यांसह भाजपच्या तंबूत दाखल झाले. त्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथे भाजपात प्रवेश केला. विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर गंगाराम पवार, विश्वास पुंजू पवार, ग्रामपंचायत सदस्य विशाल पवार, जगदीश पवार, प्रशांत पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपप्रवेश केला.

यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य सुरेश रामराव पाटील, भाजप युवा मोर्चाचे साक्री तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र देवरे, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय सोनवणे आदी उपस्थित होते. चंद्रकांत पवार हे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांचे खंदे समर्थक मानले जात होते. त्यांच्या भाजपप्रवेशाने साक्री तालुक्यासह माळमाथा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

SCROLL FOR NEXT