Technical diagrams used in witchcraft, In second photograph, Hindu Rashtra Sena officials giving a statement to the administration. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिरपूरला खासगी वसतिगृहात जादूटोणाचा संशय; पोलिसांकडून चौकशी

Dhule News : शहरातील करवंद नाक्यावरील मुलींच्या खासगी वसतिगृहात जादूटोणासदृश्य प्रकार घडल्याच्या माहितीने खळबळ माजली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : शहरातील करवंद नाक्यावरील मुलींच्या खासगी वसतिगृहात जादूटोणासदृश्य प्रकार घडल्याच्या माहितीने खळबळ माजली आहे. मुलींच्या रुममध्ये राहणाऱ्या एका परप्रांतीय मुलीद्वारेच हे प्रकार करण्यात आले असून ती फरारी आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून कसून चौकशी सुरु आहे. शहरातील करवंद नाका परिसरात संबंधित वसतीगृह आहे. काही दिवसांपूर्वी संशयित मुलगी तेथे दाखल झाली होती. (Dhule Shirpur suspect witchcraft in private hostel)

मी राजस्थानची रहिवासी असून शहरातील एका जेईई क्लासमध्ये शिकवण्यासाठी नियुक्ती झाल्याने राहण्यासाठी आली आहे, असे तिने सांगितले. तिच्या रुममधील मुलींच्या म्हणण्यानुसार, अन्य मुली झोपल्यानंतर ती मुलगी बॅगेतून चित्रविचित्र आकृत्या असलेले कागद काढून अगम्य भाषेत पुटपुटत असे. त्यानंतर रुममधील मुलींजवळ जाऊन त्यांना स्पर्श करीत असे. हा प्रकार त्या मुलींच्या लक्षात आला.

त्यांनी जाब विचारल्याबरोबर तिने रूममधून पळ काढला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंदू राष्ट्रसेनेचे पदाधिकारी तेथे पोचले. त्यांनी या प्रकाराची माहिती मिळवली. त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलीशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र दरवेळी ती वेगवेगळी उत्तरे देत होती. तिचा खरा पत्ता कोणता, ती नेमक्या कोणत्या उद्देशाने शिरपूरला आली होती, त्या तांत्रिक क्रिया ती कशासाठी करत होती. (latest marathi news)

तिला कोणाचे सहकार्य मिळत होते, तिने तिचा खरा पत्ता दिला की नाही असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. दरम्यान, येथील हिंदू राष्ट्र सेनेतर्फे प्रशासनाला निवेदन देऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली असून विशिष्ट उद्देशाने हे कृत्य केले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

निवेदन आनंद पाटील, दिनेश कोळी, नरेंद्र कोळी, राहुल भिल, देव तनेजा, तुषार बारी, विकास बागूल, चेतन धनगर, चेतन मराठे, योगेश माळी, नक्षत्र पाटील, शुभम सोनवणे, हर्शल माळी, मयूर ईशी, निखिल सूर्यवंशी, न्हानू येशी आदींनी दिले.

समाजमाध्यमांवर चर्चा

या प्रकाराबाबत समाज माध्यमांवरील बड्या हँडल्सवर माहिती टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या हँडल्सद्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह विविध पदाधिकाऱ्यांना टॅग करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी संबंधित वसतिगृहाला भेट दिली असून मुलींशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT