Municipal team while recovering fine from shopkeeper along with confiscation of stock of plastic bags. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: शहरात दुकानदारांना दंड; यात्रोत्सवात प्रबोधन! प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराबाबत मनपाकडून कारवाईसह जनजागृती

Dhule News : प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे पथकाने त्यांच्याकडून १५ हजार रुपये दंड केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर व साठा आढळल्याप्रकरणी महापालिकेच्या पथकाने सोमवारी (ता.२२) शहरातील तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे पथकाने त्यांच्याकडून १५ हजार रुपये दंड केला. (Dhule Public awareness by municipality use of plastic bags)

दरम्यान, आदिशक्ती आई एकवीरादेवी यात्रोत्सवात मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, उपायुक्त, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, प्लॅस्टिकबंदी पथक प्रमुख लक्ष्मण पाटील यांच्या आदेशानुसार सोमवारी (ता. २२) शहरात प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई करण्यात आली.

यात तिरुपती एजन्सी, वीर प्रभू महावीर दुग्धालय व दिलीप दुग्धालय या तीन दुकानात बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, स्ट्रॉ आढळून आल्या. याप्रकरणी तीनही दुकानदारांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच सुमारे १०० किलो प्लॅस्टिक पिशव्या, स्ट्रॉ आदींचा साठाही जप्त करण्यात आला.

मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. वसावे, स्वच्छता निरीक्षक श्री. पाटील, चंद्रकांत जाधव, संदीप मोरे, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, गजानन चौधरी, साईनाथ वाघ, प्रमोद चव्हाण, शुभम केदार, रूपेश पवार, चेतन अहिरे, मनीष आघाव, गौरव माळी, रतन निरगुडे, संदीप वाघ, एजाज शेख, शहर समन्वयक जुनेद अन्सारी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे प्रकल्प अधिकारी घनश्याम जाधव, सिद्धांत जकातदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.  (latest marathi news)

यात्रोत्सवात प्रबोधन

खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती एकवीरादेवी यात्रोत्सवात धुळे महानगरपालिकेमार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४‘ तसेच ‘माझी वसुंधरा अभियान-४‘ अंतर्गत व्यावसायिक, भाविक, नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. ओला-सुका कचरा वर्गीकरण, हागणदारीमुक्त शहर, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करणे आदी विषयांवर प्रबोधन केले जात आहे.

ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या देऊ नका, सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर करू नका, कापडी पिशव्यांचा वापर करा असे आवाहन दुकानदार, व्यावसायिकांना करण्यात येत आहे. आयुक्त श्रीमती. दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त हेमंत निकम, साहाय्यक आयुक्त समीर शेख यांनी दिलेले निर्देशाप्रमाणे स्वच्छता निरीक्षक श्री. जाधव, श्री. साळवे, श्री. ठाकरे, श्री. अन्सारी, श्री. जाधव, श्री. जकातदार यासाठी परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT