Bajra and Ragi Chocolate  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बाजरीसह ज्वारी, नाचणीचे ‘चॉकलेट’; धुळे आदिवासी क्षेत्रांतील शाळांमध्ये आता नावीन्यपूर्ण उपक्रम

Dhule : जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रांतील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना बाजरी, ज्वारी व नाचणीचे चॉकलेट वितरित केले जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रांतील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना बाजरी, ज्वारी व नाचणीचे चॉकलेट वितरित केले जात आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांत हा उपक्रम राबविला जात आहे. त्यात खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांचा समावेश आहे. पोषण शक्ती निर्माण योजनेतील नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील धुळ्यासह नंदुरबार, जळगाव, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्याचा या उपक्रमात समावेश आहे. (dhule Sorghum with Bajra and Ragi Chocolate marathi news)

आदिवासी आणि आकांक्षित क्षेत्रांतील पात्र शाळांमध्ये या पोषक तत्त्वांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नाचणीचे चॉकलेट, ज्वारीसह मिश्र फळ, बाजरी पौष्टिक बार, पीनट बटर अशा आहाराचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र शाळांची संख्या आणि इतर संबंधित माहिती जिल्ह्यांमधून आधीच गोळा करण्यात आली.

शालेयस्तरावर या बारचे विद्यार्थ्यांना वाटप सुरू झाले आहे. रोज चॉकलेट बार तसेच विविध धान्यांचे बार विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे विद्यार्थीही आनंदित आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून पोषक तत्त्वे दिली जात असल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३० ग्रॅम याप्रमाणे आठ दिवस चॉकलेट मिलेट न्यूट्रेटिव्ह बार विथ रागी (नाचणी) देण्यात येणार आहे. पहिली ते पाचवीपर्यंत मिक्स फ्रूट मिलेट न्यूट्रेटिव्ह बार विथ जवार (ज्वारी) हे प्रत्येकी ३० ग्रॅम नऊ दिवसांसाठी वाटप होईल, तर सातवी ते आठवीसाठीही प्रत्येकी ३० ग्रॅम नऊ दिवस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे.

तसेच पीनट बटर मिलेट न्यूट्रेटिव्ह बार विथ बाजराचे वाटप पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येकी ३० ग्रॅम आठ दिवस, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ३० ग्रॅम आठ दिवस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे, असे शाळेतील मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला सुखावणारी बातमी! मान्सून पुन्हा सक्रिय, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: मोहन भागवत २५ ऑगस्टपासून अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

SCROLL FOR NEXT