Kanbai and Kanher esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कानबाईच्या रोटची जय्यत तयारी! खानदेशात उत्साह; 11 ऑॅगस्टला कानबाई महोत्सव

Dhule News : प्रत्येक गावात या उत्सवाची अर्थात कानबाई रोटची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गृहिणी पारंपरिक पद्धतीने तयारी गुंतल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : खानदेशात श्रावणातल्या पहिल्या रविवारी किंवा दुसऱ्या रविवारी कानबाई मातेचा महोत्सव होत असतो. गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने या उत्सवासाठी पाहिजे तेवढा उत्साह निर्माण झाला नाही. या वर्षी पावसाचा सातत्यपूर्ण जोर चांगला आहे. प्रत्येक गावात या उत्सवाची अर्थात कानबाई रोटची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गृहिणी पारंपरिक पद्धतीने तयारी गुंतल्या आहेत. खानदेशभर ११ ऑॅगस्टला कानबाईचे रोट पुजले जाणार आहे. (Dhule Successful preparation for Kanbai Rot)

खानदेशात कानबाईच्या रोटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावातील प्रत्येक भावकीत एक किंवा दोन कानबाईंचे अधिष्ठान असतेच. त्या कानबाईंचा महोत्सव श्रावणातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी सर्वत्रच दुसऱ्या रविवारी रोट साजरे होणार असल्याची माहिती कानबाईचे उपासक आणि कानबाई भजनी मंडळाचे गजू माळी यांनी दिली.

कानबाईच्या रोटची तयारी दोन-तीन आठवडे अगोदरच करावी लागत असते. गृहिणी दिवाळसणाची तयारी करतात, त्याप्रमाणे घरातील सारी साफसफाई, भांडे, कपडेलत्ते, घराला रंगरंगोटी आदी कामे करण्यात व्यस्त झाल्या आहेत. (latest marathi news)

भांडणतंटा विसरण्याचा सण

भाऊबंदकीतील रोट साजरा करण्यासाठी चाकरमानीही गावाकडे आवर्जून परतत असतात. एकमेकांतील हेवेदावे व भांडणतंटे विसरून सारे एकत्रित येत रोटाचे सेवन करीत असतात. आता चाकरमान्यांनाही कानबाई रोटाचे वेध लागले आहेत.

दरम्यान, १० ऑगस्टला कानबाईचे आगमन होईल. त्या रात्री भाजी भाकरीचे रोट होतील. दुसर्‍या दिवशी रविवारी कानबाईचे प्रतिष्ठापना आणि पुजन होईल. रोटचा नैवेद्य दाखविला जाईल. सोमवारी कानबाईचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT