Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वकिलासह परिचारिकेचे घर फोडले! वडजाई येथील प्रकार; रोकडसह 2 लाखांचा ऐवज लंपास

Dhule News : वडजाई (ता.धुळे) येथे एकाच रात्री चोरट्यांनी वकिलासह परिचारिकेच्या घरात धाडसी चोरी केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : वडजाई (ता.धुळे) येथे एकाच रात्री चोरट्यांनी वकिलासह परिचारिकेच्या घरात धाडसी चोरी केली. दोन्ही ठिकाणांहून सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शनिवारी (ता.१) सकाळी या घटना निदर्शनास आल्या. माहिती मिळाल्यावर मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. (thieves robbery at house of lawyer along with nurse)

वडजाई येथील ॲड. गणेश मगन पवार हे उकाड्यामुळे शुक्रवारी (ता.३१) परिवारासह घराच्या गच्चीवर झोपले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातून ७० हजारांची रोकड व सात ते आठ ग्रॅम सोन्याचे दागिने, दहा ते बारा भार चांदी असा ऐवज चोरून नेला. अ‍ॅड. पवार हे शनिवारी (ता.१) सकाळी उठले तेव्हा त्यांना घराचा मागचा दरवाजा तोडलेला दिसला.

कपाटही उघडे दिसले. तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी अ‍ॅड. पवार यांच्या घराजवळील परिचारिका उषाबाई रोहिदास भिल यांच्याकडेही चोरी केली. उषाबाई घराबाहेर झोपलेल्या असताना चोरट्यांनी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश केला व लोखंडी पेटी चोरुन नेली.

पेटीत शेतीकाम व बैलजोडी घेण्यासाठी बँकेतून काढून आणलेली एक लाखाची रोकड, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, दहा ग्रॅम सोन्याची माळ, पाच ग्रॅमचे कानातील बाळ्या असा ऐवज होता. दरम्यान, चोरट्यांनी घरातून चोरलेली ही पेटी घरापासून १०० ते २०० मीटर अंतरावरील एका शेतात विहिरीजवळ लोखंडी कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळली.

दोन्ही घटनांसंदर्भात माहिती मिळाल्यावर मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, संदीप काळे, प्रभाकर सोनवणे, प्रकाश लोहार, प्रेमराज पाटील, सुमीत चव्हाण, ठसेतज्ज्ञ विनोद खरात, धनंजय मोरे.

मनोज ब्राह्मणे, प्रशांत माळी, प्रकाश भावसार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच श्वानाच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अ‍ॅड. गणेश पवार यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT