Police taking action in traffic cases. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Traffic Rules Break : धुळ्यात नियमांचे उल्लंघन, ध्वनी प्रदूषणातही भर! पोलिसांकडून 70 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

Dhule News : शहरात ट्रिपल सीट, धावत्या वाहनावर मोबाईल हाताळणे आणि कर्णकर्कश सायलेन्सरद्वारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या सुमारे ७० वाहनचालकांवर पोलिस उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी व शहर वाहतूक शाखेने कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरात ट्रिपल सीट, धावत्या वाहनावर मोबाईल हाताळणे आणि कर्णकर्कश सायलेन्सरद्वारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या सुमारे ७० वाहनचालकांवर पोलिस उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी व शहर वाहतूक शाखेने मंगळवारी (ता. २३) कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे ७० हजारांचा दंड वसूल केला. पुढील पाच दिवस ही विशेष मोहीम शहरात सलग राबविली जाईल. (Violation of rules in Dhule)

वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे असे श्री. रेड्डी यांनी सांगितले. शहरात काही महिन्यांत वाहनचालकांकडून दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणे, चालत्या वाहनावर मोबाईल संभाषण करणे, बुलेटला कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणे, अल्पवयीन चालकांच्या हाती वाहन देणे आदी प्रकारात वाढ झाली आहे.

त्यामुळे रस्ते अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांनी अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून मंगळवारी सकाळी अकरा ते दुपारी एकदरम्यान शहरातील संतोषी माता चौक.

कमलाबाई चौक, बारापत्थर चौक, पारोळा रोड, कराची चौक, पंचवटी चौक, दत्त मंदिर चौक, गोंदूर रोड स्टेडियम आदी ठिकाणी शहर वाहतूक शाखेसह धुळे शहर, चाळीसगाव रोड, आझादनगर, देवपूर, पश्चिम देवपूर, मोहाडी पोलिस ठाण्यांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. (latest marathi news)

अशी झाली कारवाई

दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ६० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना एकूण ६० हजारांचा दंड आकारण्यात आला. तसेच चालत्या वाहनावर मोबाईल संभाषण करणाऱ्या सात वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना प्रत्येकी हजारप्रमाणे सात हजारांचा दंड केला. कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या तीन बुलेट वाहनचालकांवर कारवाई झाली.

त्यांना तीन हजारांचा दंड आकारला. ही विशेष मोहीम सलग पाच दिवस राबविली जाईल. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि कारवाईपासून बचाव करावा, असे आवाहन उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी व शहर वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT