Although there is water storage in the Akkalpada project, the picture shows that the water level of the villages along the Panjra river is decreasing. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Scarcity : प्रकल्पात गाळ साठल्याने पाणी समस्येत ‘भर’; साक्री तालुक्यात दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद

Dhule Water Scarcity : साक्री तालुक्यातील सर्वच लहान-मोठ्या धरणांत सुमारे ६० टक्के गाळ साचल्याचे बोलले जाते. गाळ साचल्यामुळे भविष्यात दुष्काळाचे चटके अधिकच सहन करण्याची वेळ येणार आहे.

दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : निसर्गाच्या अवकृपेमुळे साक्री तालुक्यात दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. पण केवळ नैसर्गिक आपत्तीमुळेच नव्हे तर शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र जाणवत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण दर वर्षी सर्वच ठिकाणच्या लहान-मोठ्या प्रकल्पांतील गाळ काढणे आवश्यक आहे. साक्री तालुक्यातील सर्वच लहान-मोठ्या धरणांत सुमारे ६० टक्के गाळ साचल्याचे बोलले जाते. (Dhule Water Scarcity About 60 percent silt accumulated in all small and large dams in Sakri taluka)

गाळ साचल्यामुळे भविष्यात दुष्काळाचे चटके अधिकच सहन करण्याची वेळ येणार आहे. गाळ अधिक साचल्यामुळे पाणीसाठा कमी असतो. म्हणून तालुक्यात दर वर्षी पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली आहे. गाळ काढण्यासाठी शासनाची उदासीनता दिसून येते. शासनाने ‘गाळमुक्त धरण’ अशी अभिनव योजना आणली होती.

शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी असतात यात शंकाच नाही. पण राबविणारी यंत्रणा, अधिकारी चांगले असले तर शासकीय योजनाचा फायदा तळागाळापर्यंत जाऊ शकतो. गाळमुक्त धरण योजनेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चात गाळ काढून न्यावा अशी तरतूद होती.

प्रकल्पांत अल्प जलसाठा

यंदा भीषण दुष्काळाचे चटके आतापासूनच जाणवायला लागलेले असताना तालुक्यातील पाणी प्रकल्पातील घटती पातळीदेखील चिंताजनक आहे. सध्या तालुक्यातील तीन मध्यम व आठ लघु प्रकल्प मिळून एकत्रित सरासरी केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. साक्री तालुक्यात आदिवासी भागातील काबऱ्याखडक, लाटीपाडा, मालनगाव, जामखेली यांसारखे प्रकल्प आहेत.

धरण क्षेत्राजवळ असलेल्या आदिवासी बांधवांना गाळ काढून नेण्यासाठीचा आर्थिक खर्च न परवडणारा आहे. शासकीय मदत मिळाल्यास गाळमुक्त धरण योजनेस बळ मिळणार आहे. तालुक्यात प्रमुख तीन मध्यम, तर आठ लघु प्रकल्प आहेत. तालुक्यातील धरणांविषयीची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता पाटबंधारे विभागाचे शासकीय अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे वास्तव आहे.

सद्यःस्थितीत पिंपळनेरच्या लाटीपाडा प्रकल्पाची पाणीसाठ्याची क्षमता १,२५८ एमसीएफटी आहे. आज शिल्लक पाणीसाठा ३३० एमसीएफटी म्हणजेच अवघा २६ टक्के आहे. मालनगाव प्रकल्पाची पाणीसाठ्याची क्षमता ४१० एमसीएफटी असून, शिल्लक साठा अवघा १६५ एमसीएफटी आहे.

लघु प्रकल्प कोरडेठाक

धरणातून साक्री नगरपंचायतीसाठी फेब्रुवारीत आवर्तन सोडल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून, पाणी संकट आ वासून उभे आहे. लघु प्रकल्पातील शेलबारी, विरखेल, बुरुडखे प्रकल्पात नगण्य साठा, तर उर्वरित काबऱ्याखडक, बेहेड, शेवाळी, ककाणी, कायकंडा (काळगाव) लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या उन्हामुळे बाष्पीभवनातून प्रचंड घट होत आहे. पुढे तर स्थिती आणखीन बिकट होणार असून, पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येणार आहे.

"शासनाने गाळ काढण्यासाठी जेसीबी, पोकलेन यंत्र उपलब्ध करून द्यावे. शेतापर्यंत गाळ वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर वा टिपरच्या डिझेलसाठी अनुदान मिळवून देत गाळमुक्त धरण योजना राबवत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा."-जितेंद्र मराठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: सेन्सेक्स 718 अंकांच्या वाढीसह उघडला; बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी, तेजीचे कारण काय?

Latest Marathi News Live Updates : मुसळधार पावसामुळे दादर स्टेशन परिसरातील सखल भागांत पाणी साचले

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Asia Cup मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळावे की नाही? केदार जाधव म्हणतो, 'मला विश्वास आहे की...'

Reverse Mortgage Loan: बँक दरमहा EMI भरणार; कर्जाची रक्कम परत करण्याचंही टेन्शन नाही

SCROLL FOR NEXT