उत्तर महाराष्ट्र

विहिरीचे पाणी आटल्याने टँकर भरण्यात अडचणी

सकाळवृत्तसेवा

येवला - शहराच्या पाणीयोजनेचा साठवण तलाव आटल्याने तालुक्यासाठी टँकर भरल्या जाणाऱ्या विहिरींचाही पाणी उपसा होऊ लागला आहे. यामुळे टँकर भरण्यासाठी अडचण होत असून, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. रोजच टँकरग्रस्त गावे वाढत असून खेपा वाढवण्याची मागणी होत असल्याने यामुळे विहीर अधिग्रहण करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

फेब्रुवारी उजाडला अन सोबतच थंडी कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. तर गावोगावी थोडेपार असणारे जलसाठ्याचा पाणीसाठाही आटत कोरडेठाक झाले आहे. आजमितीस अर्धा तालुका टंचाईने ग्रासला असून, मिळेल तेथून पाणी उपलब्ध करणे आणि जेवढी शक्य होईल तेवढी काटकसर करणे हेच पर्याय आता उत्तर पूर्व भागातील नागरिकांना अवलंबावे लागत आहे. 

फेब्रुवारीच असला तरी आजच २७ खाजगी व २ शासकीय टॅंकरने रोज ४७ गावे व २९ वाड्यांवर ७५ खेपा पाणीपुरवठा केला जात आहे. हे टॅंकर येवल्यातील नांदूर व धूत विहिरीवरुन भरले जात असून, सरासरी १४ हजार लिटर पाणी एका खेपेला असे १० ते १२ लाख लिटर पाणी रोज येवलेकरांची तहान भागवत आहे.

विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्यासह घरातील अंघोळ कपडे व इतर गरजा भागवून शेतकरी टँकरच्या पाण्यावर जनावरांची तहान भागवत आहे. यामुळे मिळवलेले पाणी काही तासातच संपत असल्याने पाणीबाणी स्थिती अनेक गावांमध्ये आजच तयार झाली आहे. ३८ गाव पाणी योजनेने ५१ गावांची सुरळितपणे तहान भागविली जात असल्याने हा मोठा आधार तालुकावासियांना झाला आहे. मात्र इतर ९० वर गावे-वाडय़ांचा टंचाईचा बंदोबस्त होत नसल्याने आगामी तीन महिन्यातील चिंता आत्ताच सतावत आहे.

तालुक्यांसाठीच रोजचे ७५ टँकर पाणी शहराच्या पाणी योजनेचा साठवन तलावालगतच्या नांदूर व धूत विहिरीवरून भरले जात आहेत. मात्र साठवण तलावांनी तळ गाठल्याने या विहिरींचा पाणी उपसा होत असून टँकर भरणे जिकरीचे झाले आहे. दुपारी तीन वाजेनंतर तर विहिरींचा तळ उघडा पडत असल्याने टँकर चालक रात्री दोन वाजेपासूनच रांगा लावून पाणी भरत सकाळी नेमलेल्या गावात पाणी पोचवत आहे. तलावात पाणी येण्यासाठी अजून महिना जाणार असल्याने दिवसागणिक टँकर भरण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

या गावांना तहान भागते टँकरवर...
रहाडी, धामणगाव, कासारखेडे, शिवाजीनगर बाळापुर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, खिर्डीसाठे, लहित, गुजरखेडे, सोमठाणजोश, पांजरवाडी, अनकाई, राजापूर, वाघाळे, खरवंडी, आडसुरेगाव, कोळम बुदुक, कोळम खुर्द, डोंगरगाव, कौटखेडे, नायगव्हाण, हडपसावरगाव, भुलेगाव, धनकवाडी, देवदरी, निळखेडे, पन्हाळसाठे, गारखेडा, वसंतनगर, खामगाव, देवळाने, दुगलगाव, देवठाण, बदापूर, बोकटे, ममदापूर, गोरखनगर या गावासह नगरसूल परिसरातील 12 वाड्या, राजापूर परिसरातील तीन वाड्या, भगतवस्ती अनकाई), बोराडे वस्ती(गोरखनगर), हनुमाननगर (खिर्डीसाठे), अहिरेवस्ती (पिंपळखुटे खु), सायगाव येथील महादेववाडी, कुळधरवस्ती (सायगाव), ममदापूर परिसरातील दोन वस्त्या, देवदरी (दाणेवस्ती), खरवंडी(बावाचेवस्ती), तळवाडे परिसर ४ वस्त्या आदि ठिकाणी टँकरणे पाणीपुरवठा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT