Nandurbar: Amar Bhil, Bharti Bhil and Divyang Akshara with the police after the dispute was settled at the taluka police station.
Nandurbar: Amar Bhil, Bharti Bhil and Divyang Akshara with the police after the dispute was settled at the taluka police station. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : चिमुकल्या अक्षराला लाभली मायेची ऊब; समुपदेशन केंद्राच्या प्रयत्नांतून पती-पत्नीतील वाद संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : पती-पत्नीतील कौटुंबिक वादात आठ वर्षाची चिमुकली अक्षरा हिला अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. चिमुकल्या अक्षराला बोलता येत नाही.

पायाने अधु असल्याने चालता येत नाही. त्यातच घरात अठराविश्‍वे दरिद्री असल्याने पतीने पत्नीला घरातून काढून दिले. मात्र, चिमुकलीसाठी आईची आर्त हाक खाकीला समजली. पोलिस अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा माणसंच असतात, याचा प्रत्यय यातून आला. (Disputes between husband and wife end with efforts of counseling center Dhule News)

तपासाची सूत्र फिरवत नंदुरबार तालुका पोलिसांनी पती-पत्नीचे समुपदेशन करून वाद संपुष्टात आणला. चिमुकलीचा सांभाळ करण्याचे वचन पती-पत्नी कडून घेतले.

घटना अशी आहे की, भारती अमर भिल हिचे माहेर शिरपूर तालुक्यातील तर सासर नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील आहे. पती अमर भिल यांच्याशी कौटुंबिक वाद निर्माण झाल्याने अमर यांनी पत्नीला माहेरी काढून दिले.

आठ वर्षाची चिमुकली अक्षराला मात्र अमर यांनी स्वतःजवळ ठेऊन घेतले. शेवटी आई ही आई असते. भारती भिल यांनी वडिलांसोबत धुळे गाठत महिला समुपदेशन केंद्रात मुलगी मिळावी म्हणुन अर्ज दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथील समुपदेशक इंदिरा पावरा यांनी तिचे सासर नंदुरबार येथील असल्याने तेथील केंद्रातील ॲड. राहुल जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार भारती यांनी वडिलांसोबत नंदुरबार तालुका पोलिस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना अर्ज देतानाच ॲड. जगताप आणि समुपदेशक मालिनी गावीत यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

त्यावर पोलिस निरीक्षक श्री. पवार यांनी तत्काळ पोलिस कर्मचारी ज्ञानेश्‍वर सामुद्रे यांना चौकशी करून माहिती घेण्याच्या सुचना दिल्या. पोलिसांनी रजाळे गावातील अमर भिल यांना संपर्क साधत पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले.

त्यावेळी भारती यांचा पती अमर भिल कुटुंबीयांसह अक्षरालासुद्धा घेऊन आला. चिमुकलीला पाहून सर्वांचे डोळे भरून आले. भारती व अमर यांचे समुपदेशन करण्यात आल्याने दोघांचा वाद संपुष्टात आला. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावीत, महिला व बालविकास विभाग सभापती संगीता भरत गावीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, महिला व बालविकास अधिकारी कृष्णा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन केंद्राचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT