Dr.-Arti-Singh
Dr.-Arti-Singh 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षकपदी डॉ. आरती सिंग

सकाळवृत्तसेवा

नाशिक - नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी औरंगाबादच्या डॉ. आरती सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात नाशिकचे पोलिस अधीक्षक संजय दराडे यांची विक्रीकर भवन (मुंबई) येथे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली. मात्र, त्यांची जागा रिक्त होती. 

डॉ. आरती सिंग औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहत होत्या. बुधवारी (ता. २७) शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या बदल्यांनुसार नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून डॉ. आरती सिंग यांची नियुक्ती झाली. 

याशिवाय धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांची ठाणे शहरात पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली. श्री. पानसरे यांच्या बदलीमुळे गेल्या दहा महिन्यांपासून पदभार स्वीकारण्याच्या प्रतीक्षेत असलेले डॉ. राजू भुजबळ यांची वाट मोकळी झाली आहे. ते आता धुळ्याच्या अपर पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे घेऊ शकतील.  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिनाभरापासून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT