उत्तर महाराष्ट्र

नाशिककरांची पाणीकपात नको

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अद्याप ९७८ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक असल्याने पाणीकपात करू नये. धरणातील जॅकवेलपर्यंत पाणी पोचण्यासाठी चारी खोदावी, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मराठवाड्यातील जायकवाडी धरण समूहात यंदा पाणीसाठा कमी असला, तरी पाटबंधारे विभागातर्फे गंगापूर धरण समूह व पालखेड धरण समूहातून ०.६० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार होते; परंतु वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केल्यानंतर पाणी सोडण्यास स्थगिती देण्यात आली. आता गंगापूर धरणातील इन्टेक वेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत धरणाचे पाणी पोचल्याने पाणी सोडू नये, अशी विनंती महापालिकेने पाटबंधारे विभागाला केली. पाणीटंचाई लक्षात घेता महापालिका प्रशासनातर्फे एकवेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात असल्याने आमदार प्रा. फरांदे यांनी कपातीला विरोध केला आहे. गंगापूर धरणातील चार हजार २०० दशलक्ष घनफूट पाण्यापैकी तीन हजार ५५० दशलक्ष घनफूट महापालिकेने धरणातून उचलले आहे. अद्याप ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके ६५० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. धरणात एकूण ९७८ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही, असे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने धरणाच्या मृतसाठ्यापर्यंत चारी खोदून न्यूनतम पातळीपर्यंत पाणी आणण्याची मागणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT