Police Station furnished by Police Inspector Shriram Pawar esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: दोंडाईचा पोलिस ठाण्याचा झाला कायापालट..!

पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या कामगिरीने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दोंडाईचा पोलिस ठाणे म्हणजे संवेदनशील आणि गजबजलेले पोलिस ठाणे म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पोलिस निरीक्षक ते पोलिस कर्मचारी यायला टाळतात, जे येतात ते जायच्या तयारीत असतात हा इतिहास आहे.

मात्र पोलिस निरीक्षक श्रीराम पवार रुजू झाले आणि या पोलिस ठाण्याचे रूपच पालटले. (Dondai police station has been transformed Employees satisfied with performance of Police Inspector Shriram Pawar Dhule News)

या पोलिस ठाण्यात अनेक दिवसांपासून समस्या होत्या. सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बसायला जागा नव्हती. आहे त्या परिस्थितीत कारभार चालत होता.

पोलिस निरीक्षकांचा दरवाजा उघडा दिसला की साहेब आहेत असे समजायचे आणि दरवाजा बंद राहिला की साहेब नाहीत असा येणाऱ्या-जाणाऱ्या मंडळींचा समज होता.

पोलिस निरीक्षक संवाद साधत असताना बाहेरील मंडळी दरवाजात उभे राहून गर्दी करत असत. मात्र पोलिस निरीक्षक श्रीराम पवार रुजू झाले आणि त्यांनी सर्वांत आधी पोलिस ठाणे सुस्थितीत करण्यास सुरवात केली.

पोलिस ठाण्याला शोभेल अशी पोलिलीस निरीक्षकांची वातानुकूलित केबिन, भेटायला येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी खुर्च्या अशी व्यवस्था निर्माण केली. सहाय्यक पोलिस निरीक्षकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस ठाण्याच्या आवारात खासगी वाहने उभी केली जात होती. मात्र आता पोलिस ठाण्याला कुंपण घालण्यात आले असून, सर्व गाड्या बाहेर लावण्यात येत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यात येत आहे.

सध्या तरी त्यांची मरगळ झटकली असून, शिस्तीने काम करताना व कायदा व सुव्यवस्थेत बदल होताना दिसत आहे.

पोलिस ठाणे चकाचक झाले असून, अंतर्गत व्यवस्था सुस्थितीत केली आहे. पोलिस निरीक्षक पवार यांनी अनेक बदल केल्याने कर्मचारी वर्गाच्या कामगिरीतही बदल होताना दिसत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT