save girl child  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : प्रत्येकाने लेक वाचविण्यासाठी प्रयत्न करावा : डॉ. हीना गावित

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नवरात्रीत जसे आपण मातृशक्तीचा सन्मान करत आहोत, त्याचप्रमाणे ३६५ दिवस ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’साठी प्रयत्न करावा लागेल.

आपल्या जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर घटत असून, प्रत्येकाने लेक वाचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन खासदार डॉ. हीना गावित यांनी केले.( Dr Heena gavit statement of try to save girl child jalgaon news)

नवरात्रीनिमित्त येथील हिंदू सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांच्यातर्फे १०९ कन्यापूजन आणि कन्या भोजनाचे आयोजन मोठा मारुती मंदिर सभागृहात करण्यात आले होते.

पुजनाची सुरुवात अंबिका मातेची महाआरती आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रतिमापूजनाने झाली. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित, आरोग्य अधिकारी विशाल कांबळी, प्रा. युवराज भामरे, उद्योगपती सुरेश अग्रवाल, ॲड. अनिल लोंढा, ॲड. अविनाश पाटील, अशोक चौधरी, डॉ. नरेंद्र पाटील उपस्थित होते.

पालिका शाळेतील १०० आणि मतिमंद शाळेतील ९ असे १०९ कन्यांचे कन्यापूजन मान्यवर आणि जैन, अग्रवाल, सोनार समाज महिला मंडळ व भामरे ॲकॅडमीच्या भगिनी यांच्या हस्ते करण्यात आले. कन्यापूजन सर्व कन्यांचे पाद्यपूजा करून करण्यात आले. हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी कन्यापूजनचे महत्त्व सांगितले.

डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यात एकाचवेळी १०९ कन्यापूजन करून मातृशक्तीचा सन्मान केल्याबद्दल हिंदू सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांचे कौतुक केले. खासदार डॉ. हीना गावित यांनी नवरात्रीत जसे आपण मातृशक्तीचा सन्मान करत आहोत त्याचप्रमाणे ३६५ दिवस 'बेटी बचाओ- बेटी पढाओ'साठी प्रयत्न करावा लागेल. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घटत असून, प्रत्येकाने लेक वाचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमात संघटनेची प्रार्थना जागृती पाटील हिने केली. राजू चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. पंकज डाबी यांनी आभार मानले. कार्यक्रम यसस्वितेसाठी हिंदू सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांचा धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT