Onion
Onion esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कांद्यामुळे शेतकरी रडकुंडीला; जिल्ह्यात उत्पादक आर्थिक संकटात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठड्यात सरासरी साडेबारा हजारांवर क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

दरात क्विंटलला आठशे ते एक हजाराची घसरण झाली. (Due to ban on onion export it has affected onion farmers dhule news)

नीचांकी किमान शंभर ते दोनशे रुपये, सर्वाधिक ९५८ ते एक हजार ८२०, तर सर्वसाधारण आठशे ते एक हजार ४७५ रुपये प्रतिक्विंटल कांद्याला दर मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आले आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलो १५ ते ३० रुपये दराने कांद्याची विक्री होत असल्याने बाजार समितीतील दरात आणि किरकोळ दरात मोठी तफावत दिसून येत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांत २७ जानेवारीला सर्वाधिक चार हजार ८११ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. सर्वसाधारण आठशे, किमान शंभर, तर कमाल एक हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मंगळवारी (ता. ३०) एकूण ६०० क्विंटल आवक झाली.

आठवड्यातील दर

सर्वसाधारण ९२० रुपये तसेच किमान ८३५, तर कमाल ९७० रुपये प्रतिक्विंटल दर उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पडला. २९ जानेवारीला एक हजार १८५ क्विंटल आवक झाली. सर्वांत कमी २२५ रुपये, तर सर्वाधिक ९५८ रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. सर्वसाधारण दर ८०० रुपये होता. २४ जानेवारीला ५६५ क्विंटल आवक झाली. कमीत कमी ६१० ते सर्वाधिक एक हजार ६६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

सर्वसाधारण दर एक हजार रुपये होता. २३ जानेवारीला एक हजार ४५ क्विंटल आवक झाली. कमीत कमी ७०० ते सर्वाधिक एक हजार ६६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर एक हजार रुपये होता. २० जानेवारीला एक हजार २९० क्विंटल आवक झाली. कमीत कमी ८०० ते सर्वाधिक एक हजार १८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

सर्वसाधारण दर एक हजार ३३५ रुपये होता. १९ जानेवारीला दोन हजार ५०९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी ५७८ ते सर्वाधिक एक हजार ६५८ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर एक हजार ४७५ होता.

दरामध्ये घसरण

१८ जानेवारीला ही आवक ५५५ क्विंटल होती. तेव्हा सर्वांत अल्प दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार ७०० रुपये क्विंटल होता. १ डिसेंबरला पाच हजार ८५९ क्विंटल आवक झाली. तेव्हापासून दरात घसरण होऊन एक हजार २०० ते तीन हजार ८८८ रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार ३५० रुपये क्विंटल होता.

नोव्हेंबरच्या मध्याला क्विंटलला सरासरी चार हजार आणि सर्वाधिक चार हजार ८०० रुपयांवर पोचलेला कांदा आता किमान १०० रुपये व कमाल एक हजार ८२० रुपयांवर आला आहे. आज कांद्याला सर्वसाधारण आठशे ते एक हजार ४७५ रुपये दर आहे.

किरकोळ बाजारात कांद्याची विक्री १५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. वाढलेली मजुरी व खते, बियाण्यांच्या वाढलेल्या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कांदाशेती परवडेनाशी...

गेल्या तीन वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, हवामानातील बदलामुळे वाढलेली रोगराई तसेच सरकारी धोरण यामुळे कांदा शेती परवडेनाशी झाली आहे.

त्यातच कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने तत्काळ हटविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT