Maharashtra State Electricity Distribution Company esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Electricity News: वीजग्राहकांना लवकरच मिळणार प्रीपेड स्मार्ट मीटर; आवश्‍यकतेनुसार वापर करता येणार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Electricity News : वीजग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीजवापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून, काही महिन्यांत हे मीटर टप्प्याटप्प्याने कार्यरत होतील.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. (Electricity consumers will get prepaid smart meters nandurabar news)

त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे. राज्यातील महावितरणच्या दोन कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून, त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येईल. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीजग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येईल.

किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हेसुद्धा ग्राहकांना समजेल.

मुख्य म्हणजे ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळेल. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे. सध्याच्या पद्धतीत वीजग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार बिल पाठविले जाते.

एखाद्या ग्राहकाने नेहमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येते व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन कोलमडते. वीज वापरली असल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो. पण नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीजग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येईल.

अचानक रात्री वीज खंडित होणार नाही

प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हेसुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल. घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन पेमेंटचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाईलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था आहे.

एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीजपुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा सुरू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीजपुरवठा सुरू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Monthha : चक्रीवादळ ‘मोंथा’ धडकणार! ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; लष्करी तुकड्याही 'अलर्ट मोड'वर

Bacchu Kadu: मंगळवारी नागपुरात महाएल्गार मोर्चा; मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न

Daily Walking Health: रोज चालण्याने 'हे' 5 आजार होणार छूमंतर, पोषणतज्ज्ञ सोनिया नारंग यांचा खास व्हिडिओ पाहा

Latest Marathi News Live Update : इंदापूरमध्ये राजकीय भूकंप! हर्षवर्धन पाटील यांचे तीन शिलेदार भरणे गोटात जाणार

Pro Kabaddi 12: यू मुंबावर पटना पायरेट्सचा दणदणीत! आता एलिमिनेटर १ मध्ये जयपूर पिंक पँथर्सला भिडणार

SCROLL FOR NEXT